विशेष प्रतिनिधी, मुंबई
तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करीत असाल किंवा करणार असाल तर तुमच्यासाठी ही नवी बातमी आहे. कारण रिझर्व्ह बँक आफ इंडिया १ ऑगस्टपासून तुम्हाला आणखी सोयी उपलब्ध करून देणार आहे. एसआयपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ईसीएस)ची जागा घेणाऱ्या नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (एनएसीएच)ला रिझर्व्ह बँकेच्या वतीने दररोज काम करू शकेल एवढे समक्ष केले जात आहे. अर्थात याची सर्व्हिस दररोज मिळेल. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तशी माहिती दिली आहे.
एनएसीएच हे क्लिअरिंगचे नवे सिस्टिम आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आफ इंडियाने एनएसीएच लागू केले आहे. सर्व नवे म्युचुअल फंड एसआयपी आता एनएसीएचमध्ये रजिस्टर करावे लागणार आहे. एनएसीएच ही वन टाईम रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. या माध्यमातून म्युचुअल फंडात एकरकमी एसआयपी गुंतविण्याची सोय आहे. तुम्ही तुमच्या बँकेला दररोज ठरलेली रक्कम एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतविण्यासाठी डेबिटची परवानगी देऊ शकता.
ग्रामीण बँकांनाही दिलासा
रिझर्व्ह बँक आफ इंडियाने विभागीय ग्रामीण बँकांनाही मोठा दिलासा दिला आहे. आता या बँका डिजॉझिटचे प्रमाणपत्र जारी करू शकणार आहेत. या माध्यमातून ग्रामीण बँकांसाठी अवाका वाढविण्याचा एक मार्ग मोकळा झाला आहे.