सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इनोव्हा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली .सिन्नर-शिर्डी महामार्गावरील फुलेनगर फाट्याजवळील पेट्रोल पंपावर जवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये वैभव अशोक कुलकर्णी (३८) व सुवर्णा अशोक कुलकर्णी (७०) रा. पंचवटी या मायलेकांचा मृत्यू झाला आहे. यांचे मूळ गाव वावी आहे. फुलेनगर फाट्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरून दोघे फुलेनगरकडे हे दोघे जात होते. यावेळे शर्वरी लॉन्स समोरील रस्ता ओलांडत असतांना सिन्नरवरून शिर्डीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या इनोव्हा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.दशरथ मोरे व नितीन जगताप करत आहे.