सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा विजय ४१ हजाराच्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उदय सांगळे हे पराभूत झाले. या मतदारसंघात आमदार कोकाटे यांना १ लाख ३२ हजार ९९७ मते मिळाली. ते ४१ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उदय सांगळे यांना ९७ हजार ६८१ मते मिळाली.
कोकाटे यांचा विजाय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यासाठी ट्रक मधून गुलालही आणला होता. त्यामुळे सर्वीकडे गुलालमय रस्ते झाले होते माणिकराव कोकाटे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या तसेच प्रकाश भाऊ वाजे व खासदार राजाभाऊ वाजे यांचे कट आउट घेऊन कार्यकर्ते हे नाचताना दिसत होते तो एक चर्चेचा विषय ठरला. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रत्येक शुभेच्छा बॅनर वर कार्यकर्त्यांनी प्रकाश वाजे यांचा फोटो छापले. त्यामुळे सर्वीकडे एकच विषय चर्चेला जात होता त्यामुळे या निवडणुकीसाठी प्रकाश वाजे हेच कारणीभूत ठरले, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. पाचव्यांदा माणिकराव कोकाटे यांना विधानसभेत सिन्नरकरांनी पाठवल्याने सगळीकडे एकच जल्लोष बघायला मिळाला.
लोकसभा निवडणुकीत कायमच निर्णायक भूमिका बजावणारा मतदारसंघ म्हणून सिन्नर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयात सिन्नरने सिंहाचा वाटा उचलला. सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत रंगली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली होती. सांगळे यांच्यामुळे ही लढत चुरशीची ठरली होती. मात्र या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी बाजी मारली आहे.
आमदार कोकाटे हे सहाव्यांदा निवडणुकीला विजय मिळवला. …
ऍड माणिकराव कोकाटे यांनी १९९९, २००४ मध्ये शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवित विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. २०१९ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवित विजय मिळवला होता.
वाजे गटातील काही कार्यकर्त्यांचा माणिकराव कोकाटे यांना पाठिंबा?..
या विधानसभेच्या निवडणुकीसाठी वाजे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची झाली होती. अनेक कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांना पाठिंबा देत त्यांच्या व्यासपीठावर भाषणे केली तर प्रकाश भाऊ वाजे व दीप्ती वहिनी यांनी मला मदत केल्याचे. कोकाटे यांनी जाहीर सभेत सांगितल्याने. अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या त्यामुळे या निवडणुकीत वाजे यांना केंद्रस्थानी मानून निवडणुकीचे लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे व्यक्तिगत असणारी निवडणूक नंतर जातीय समीकरणावर जाताना दिसली त्यामुळे जातीय समीकरणाच्या गणितामुळे निवडणूक प्रतिष्ठेची मांडली गेली होती.