गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर-शिर्डी हायवेवर खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रकचा भीषण अपघात; १० ठार, १७ गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भिती

by India Darpan
जानेवारी 13, 2023 | 9:36 am
in मुख्य बातमी
0
IMG 20230113 WA0004 e1673582698261

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे. बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की बस आणि ट्रक यांचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या भीषण अपघातात तब्बल १० जण ठार झाले आहेत. तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.

सिन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी ट्रॅव्हल बस (क्रमांक एम एच ०४ एसके 2751) मुंबई येथून शिर्डीकडे जात होती. तर,  माल ट्रक (क्रमांक एम एच 48 टी 12 95) शिर्डीहून सिन्नरकडे येत होता. बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. हा अपघात अतिशय भीषण होता. अपघातामुळे मोठा आवाज झाला. बसमध्ये प्रवासी झोपलेले होते. अचानक झालेल्या या अपघाताने प्रवाशांना जीव वाचविण्याचीही संधी मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अॅम्ब्युलन्स यांचा मोठा ताफा हजर झाला. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले होते.

अपघातामुळे पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे ५० प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथील १५ प्रवासी असल्याचे समजते. मृतांची आणि जखमींची नावे कळण्यास उशीर लागेल असे पोलिसांचे म्हणणे आहे. गाईड ट्रॅव्हल्स या कंपनीची ही बस आहे. ३५ ते ४० प्रवासी उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यात मृतांचा देखील समावेश आहे.

सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाच्या
जवळ प्रवाशांना घेऊन जाणारी भरधाव बस (एम.एच04 एफके2751) उलटली.
*या भीषण अपघातात*:-
एकूण प्रवाशी-४५
मृत्यू-१०
ओळख पटलेले-०७
अनोळखी-०३
*अपघात ग्रस्तांवर पुढील रुग्णालयात उपचार सुरू*
मातोश्री हॉस्पिटल-०३
डॉ. साळुंखे हॉस्पिटल-०१
यशवंत हॉस्पिटल-१६
एकूण- २० प्रवाशांवर उपचार सुरू असून
सिन्नर रुग्णालयातून चार प्रवाशांना उपचार नंतर सोडण्यात आले आहे.

Sinner Shirdi Highway Travel Bus Truck Major Accident
10 Death 17 Injured Road Accident

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील भीषण अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल; आर्थिक मदत आणि चौकशीची घोषणा

India Darpan

Next Post
IMG 20230113 WA0005 e1673585977753

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील भीषण अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल; आर्थिक मदत आणि चौकशीची घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011