नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतमाला प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात सध्या सिन्नर बाह्यमार्गाच्या बांधकामासह NH-160 च्या सिन्नर-शिर्डी विभागाच्या चौपदरीकरणात व्यग्र असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांनी आज या अनुंषगाने ट्विट संदेश केले. या परिवर्तनकारी प्रकल्पाचे सामाजिक महत्त्व मोठे आहे. शिर्डीला पायी जाणाऱ्या साई भक्तांसाठी समर्पित मार्ग म्हणून तो काम करेल. याव्यतिरिक्त, आसपासच्या परिसरात जलद विकासाला चालना देणारे आर्थिक उत्प्रेरक म्हणूनही काम करण्यास तो सज्ज असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील शिर्डी आणि नाशिक/त्र्यंबकेश्वर या दोन प्रमुख धार्मिक शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे हा या उपक्रमाचा एक प्राथमिक उद्देश आहे. या शिवाय, शाश्वततेप्रती असलेल्या आमच्या दृढ वचनबद्धतेनुसार, प्रकल्पात कार्बन उत्सर्जन आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उल्लेखनीय तंत्रांचा समावेश केला आहे. यासाठी रस्त्यांच्या बांधकामात प्लास्टिक कचऱ्याचा वापर, सिमेंट ट्रिटेड बेस (CTB) आणि सिमेंट ट्रिटेड सब बेस (CTSB) तसेच ‘आरएपी’ वापरणे या उल्लेखनीय पद्धतींचा समावेश आहे असे गडकरी म्हणाले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देत, अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक संपर्क व्यवस्थेचे जाळे उभारण्याप्रती आमची बांधिलकी आहे असे गडकरी म्हणाले.
Sinner Shirdi Highway Minister Nitin Gadkari