सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी केली आहे. ३० ऑगस्ट पर्यंत जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणीची बैठक सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १६ ऑगस्ट रोजी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवी भाऊ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी येत्या २५ तारखेला जिल्हाधिकारी यांना सिन्नर तालुका दुष्काळ जाहीर करावा. यासाठी निवेदन देणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले. ३० ऑगस्ट पर्यंत दुष्काळ जाहीर न केल्यास. स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले. यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी प्रास्ताविक केले. सिन्नर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती नंतर सखोल अशी चर्चा करण्यात आली. यावेळी सिन्नर तालुक्यातील पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे ऑगस्ट महिना संपत आला. तरी खरीप हंगामातील कुठल्याही पिकाची पेरणी झालेली नाही .पिण्याच्या पाण्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यांचा मोठा प्रश्न उपस्थित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.
या बैठकीत नगर जिल्ह्याचे स्वाभिमानीचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान शासनाने द्यावे अशी मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्यकारणी नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली. स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक कृष्णा घुमरे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाप्रमुख पदी तुषार शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील थकीत कर्ज संदर्भात सुधाकर मोगल यांनी मार्गदर्शन केले. बाजार समितीचे सभापती डॉक्टर रवींद्र पवार यांनी सिन्नर तालुका लांबलेल्या पावसामुळे सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करावा तालुक्यात चारा छावणी, चारा डेपो सुरू करावेत. अशी मागणी केली आणि संघटनेच्या पुढील कामास पाठिंबा दिला. सिन्नर तालुका अध्यक्ष आत्माराम पगार यांनी आभार मानले निफाड तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर, सागर गवळी ,कळवण तालुका अध्यक्ष रवी शेवाळे, राजू शिरसाठ, संपत पगार, कैलास शिंदे ,धनंजय निरगुडे, निलेश पगार सचिन पगार, कचेश्वर गाडे ,संजय वारुळे, संजय पगार ,बाजार , केशव भाऊ कोकाटे, संचालक जालिंदर थोरात ,नवनाथ घुगे ,सुनील चकोर, रवींद्र शेळके आदी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ठळक मागण्या….
१) सिन्नर तालुका त्वरीत दुष्काळग्रस्त जाहीर करावा
२) गावनिहाय पिण्याचे पाणी व्यवस्थापन करावे
३) जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था तात्काळ करावी
४) कृषी पंपाचे विजबिल व सर्व कर शासनाने माफ करावे
५) शेतीचे पिक कर्जासह सर्व बँकेचे कर्ज OTS स्किम लागू करावी
६) दुधाला फॅट – ३.५ snf – ८.५ ला प्रति लिटर ४०/ रु दर मिळावा
Sinner news – Swabhimani sanghatna