सिन्नर – माळेगाव एमआयडीसीमधील रोहित फोम कंपनीत बुधवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान अचानक आग लागून सुमारे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे. कंपनीनमध्ये मॅटेसेस (गाद्या) बनविण्यासाठी लागणाऱ्या फोमचे उत्पादन केले जाते. कंपनीच्या आवारात फोम बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल ठेवलेला होता. जवळच वीजेचे मीटरच असलेली पेटी खांबावर बसवले आहे. शेजारीच कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकली लावलेल्या होता. दुपारी साडेबाराच्या गोदामास अचानक
कच्च्या मालाने पेट घेतला. वीजेचे मीटर व ताराही जळून गेला. शेजारील मोटार सायकलींचे (MH-15 GD7611 व MHI5GK 7315) मोठे नुकसान झाले असून कंपनीच्या ताडपत्र्यांचेही आगीच्या धगीने नुकसान झाले आहे. एकूण सुमारे ५ ते ६ लाखाचे नुकसान झाल्याचे कंपनीचे संचालक तानाजी पवार यांनी सांगीतले.
आग लागल्याचे कळाल्यानंतर अग्निशमन दलाचा बंब बोलावून आग आटोक्यात आणली गेली. शेजारील कंपन्या व रोहित फोम कंपनीतील कर्मचारीवर्ग यांनी आग विझविण्यात प्रयत्न केले. आगीचे निश्चित कारण समजले नसले तरी वीज मीटरच्या पेटीत स्फोट व स्पार्किंग होऊन उडालेला ठिणग्यांनी आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. कंपनीचे मीटरच जळून ‘गेल्याने कंपनीचे कामकाजही ठप्प झाले असून वीज वितरण कंपनीने त्वरीत दुरुस्ती करून वीजप्रवाह सुरळीत करावा अशी मागणीही कंपनी संचालकांनी केली आहे.