विजय गिते, सिन्नर
सिन्नर – सिन्नर तालुका औद्योगिक विकासाचे केंद्रबिंदू ठरत असून त्याची पायाभरणी स्व. नानासाहेब गडाख यांनी स्टाइसच्या माध्यमातून केली. स्टाइसची होत असलेली नेत्रदीपक प्रगती कौतुकास्पद असून प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा गडाख माळोदे यांनी केलेल्या वाढीव जमीनीच्या मागणीला अनुसरून स्टाइससाठी २०० एकर वाढीव जमीन मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली. तसंच उद्योजक, कामगार, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी एखादी अत्याधुनिक सुविधायुक्त टाऊनशिप उभारण्याचाही मानस आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.
वसाहतीच्या प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा गडाख माळोदे, यांच्या अभिष्टचिंतन सोहळा ते बोलत होते व्यासपीठावर प्रशासक मंडळाचे उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे, ज्येष्ठ उद्योजक किशोरशेठ केला, स्टाइसचे माजी चेअरमन अविनाश तांबे, पंडितराव लोंढे, माजी व्हा. चेअरमन मिनाक्षी दळवी, रामदास दराडे, विजय माळोदे, मालोशि मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब गडाख, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, स्टइसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे , अमित गडाख, अभिषेक गडाख तुषार गडाख आदी उपस्थित होते.
स्वर्गीय नानांनी सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीसाठी अनेक उद्योग उभे करून तरुणांना रोजगार दिला सिन्नर चे नाव देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर आजही शिखरावर नानांना मुळे पोहोचलेले आहे. नानांनी बघितलेले स्वप्न आज त्यांच्या कन्या श्रीमती सुधा गडाख माळोदे यांच्या रूपाने प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. कामाच्या बाबतीत तडजोड न करता दिवस-रात्र काम करण्याची पद्धत वाखानण्याजोगी आहे तसेच त्यांचे सर्व संचालक मंडळ यांचे कामकाज उत्कृष्ट आहे.
आगामी काळात तालुक्यात उद्योजकांचा ओघवाढणार असून त्यादृष्टीने उद्योजकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहती सिन्नर पुरती मर्यादित नसून आज या वसाहतीच्या ही बाहेर अनेक जागा घेऊन उद्योग आणण्यासाठी शासन दरबारी मागणी केलेली आहे.
याशिवाय उद्योजक, कामगार, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी एखादी अत्याधुनिक सुविधायुक्त टाऊनशिप उभारण्याचाही मानस असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. यावेळी आण्णासाहेब गडाख, विजय गडाख, हर्षद माळोदे, कमलाकर सिन्नर पोटे आदी उपस्थित होते. माळोदे यांनी स्व. नानासाहेब गडाख यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन देशमुख यांनी केले तर आभार विजय गडाख यांनी मानले
सुधाताईंनी वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
सुधाताई माळोदे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत स्वर्गीय नानांनी औद्योगिक वसाहतीच्या पायाभरणी पासून तर उभारणी पर्यंत वसाहतीच्या प्रत्येक भिंतीवर पाणी मारताना आम्ही बघितले आहे तसेच उद्योगांना तसेच उद्योजकांना व कामगारांना कमीत कमी व उत्कृष्ट अशी कशी सेवा देता येईल यांची कामाची पद्धत सुद्धा नाना कडून शिकलेली आहे आज जर नाना जर इथे असते तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता अशा शब्दात व अश्रूंच्या भावनिक झालेल्या शब्दात त्यांनी वाक्याला थबकत पूर्णविराम दिला पण स्वर्गीय नानांनी व या सिन्नरच्या भाग्यविधाते नानासाहेब गडाख यांचे कार्य व अपूर्ण राहिलेले स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल अशा शब्दात सुधा ताई गडाख माळोदे यांनी आश्वासन दिले. माळोदे यांनी स्व. नानासाहेब गडाख यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही दिली.