विकास गिते, सिन्नर
दिवसेंदिवस वाढत असलेले औद्योगिकरण व शहरीकरण यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबवण्यासाठी आपणही निसर्गाचे काहीतरी देणे लागतो म्हणून “मी निसर्गाचा कर्जदार” या उद्देशाने वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक गेल्या ५ वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याचे कार्य करत आहेत. दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत श्रमदान करून आजपावेतो ६ हजार वृक्षारोपांची लागवड करून त्यांचे योग्य संवर्धन केले आहे. नुकतेच सिन्नर नगरपरिषद द्वारे वीर सावरकर नगर येथे ४४ गुंठेचा ओपन स्पेस देवराई ऑक्सिजन पार्क तयार करण्यासाठी देण्यात आला आहे. वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक दतात्रय बोऱ्हाडे, अभिजित देशमुख, राजाभाऊ क्षत्रिय, अनिल जाधव, डॉ.महावीर खिंवसरा, मनोज भंडारी, संजय पवार, सचिन कासार, संदीप आहेर, सचिन आडणे, राजू गवळी, बापू भुसे, सोपान बोडके, महेश बोऱ्हाडे, संदीप खर्डे, यांचे द्वारे वीर सावरकर नगर येथे देवराई ऑक्सिजन पार्क तयार करण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२१ पासून दररोज श्रमदान कार्य करून ११०० खड्डे खोदकाम करण्यात आले आहे.
सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार व शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन उन्नती शहर स्तरीय संघातली महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या रागिणी सिन्नर शहरात नव्याने होत असलेल्या देवराई ऑक्सिजन पार्कच्या कार्यासाठी रविवारी सकाळी ७.३० ते १०.०० या वेळात वाजता म्हणजे घरातील सर्व कामे बाजूला ठेवत पर्यावरण जतन कार्यात हातभार लावण्यासाठी वीर सावरकर नगर येथे उपस्थित झाल्या व वृक्षारोपण पूर्वतयारी करीता महाश्रमदान केले. वनप्रस्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना जवळपास ८ दिवस लागणारे कार्य मोठ्या संख्येने उपस्थित महिलामुले आज केवळ २ तासात कार्य पूर्ण झाले. या कार्यात अथर्व दशपुते,वेदश्री कापुरे, सिद्धी छल्लारे, कल्पेश कोळी,श्लोक उकाडे,अनिरुद्ध हिरे, आर्षती बाळदे लहान मुलांनी देखील रिकाम्या पाट्या वाहून नेण्यासाठी मोठा हातभार लावला. सदर कार्यात ११०० खड्यांत नारळाच्या शेंड्या, शेणखत, भुसा,चुना इत्यादी टाकून वृक्षारोपण करिता पोषक खड्डे तयार करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना वनप्रस्थ फाउंडेशनचे डॉ.महावीर खिंवसरा यांनी हरित घर संकल्पाना बाबत माहिती दिली.
श्रमदान कार्यासाठी सहभागी झालेल्या रागिणी अनुराधा लोंढे, प्रीती लोंढे, शुभांगी उकाडे, रोहिणी सोनवणे, नीलिमा दशपुते, उन्नती शहर स्तरीय संघाच्या अध्यक्षा निलोफर सय्यद, अश्विनी भाकरे, शिल्पा बाळदे, कविता सोळंके, पायल दुबे, दिपाली चिंतामणी, कल्पना रेवगडे, निशा कापुरे, अनिता गांडोळे, दिपाली तायडे, वैशाली साळवे, ज्योती कोळी, शोभा आव्हाड, अश्विनी शेजवळ, सुवर्णा गोसावी, मनीषा पवार, संजीवनी राणे, प्रिया खवले, वैशाली शेळके, सुनीता विश्वकर्मा, किरण माकडे, अश्विनी पारले, पूनम आढाव,संगीता सदगीर, कल्पना पाटील प्रतिभा सोनवणे, कांचन तांबोळी, सुनीता गायकवाड, अर्चना आग्रे, अनिता मोरे, दामिनी उकाडे सुनीता पगारे, मनीषा निकम, वैष्णवी पाठक,मीना साबळे, वर्षा कापुरे, सारिका भवर,ललिता पवार, उज्ज्वला बोरसे यांचेसह अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान कार्य केले. या श्रमदान कार्यासाठी महिलांना श्रमदान स्थळी येण्या जाण्यासाठी विशाल बर्वे यांनी स्वतःची स्कूल व्हॅन निनामुल्य उपलब्ध करून दिली होती. यावेळी वनप्रस्थ फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक यांनी यावेळी मार्गदर्शन व श्रमदान कार्य केले.