सिन्नर –ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही.त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजना राबवत असते. त्यासाठी ठराविक ग्रामपंचायतींनाच शासनाकडून निधी मिळत असतो. आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या बांधकामासाठी निधी देण्याची मागणी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत पाच ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामासाठी ७५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. इमारती मंजूर झाल्याबद्दल संबंधित गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या ग्रामपंचायतींच्या होणार इमारती..
बोरखिंड, पंचाळे, पांढुर्ली,पिंपळे व सोनेवाडी इथल्या ग्रामपंचायतींना आता प्रत्येकी १५ लाख रुपये निधी शासन स्तरावरून मंजूर झाला आहे.यात ग्रामपंचायती काही रक्कम टाकून प्रशस्त इमारती बांधतील. सरपंच, ग्रामसेवक व कर्मचारी यांचे स्वतंत्र दालन, त्याचप्रमाणे स्वतंत्र सभागृह राहणार आहे.