सिन्नर- सिन्नर तालुक्यातील मालढोण येथे एका दाम्पत्याला कु-हाडीने मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दंगा व दुखापतीचा ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती आशी की, सिन्नर तालुक्यातील मालढोण परिसरात फिर्यादी नवनाथ बालाजी पावले (वय ३८ धंदा शेती ) हे आपल्या घरासमोर बसलेले असतांना यातील आरोपी हा शिवीगाळ करत चालला होता.
यावेळी फिर्यादी नवनाथ पवार यांनी कोणाला शिवीगाळ करत आहे ,असे म्हटल्याचा आरोपी मछ्चिद मनोज पावले, यास राग आल्यामुळे त्याने यावेळी फोन लावून आरोपी पोपट मनाजी पावले व इतरांना फोन करुन बोलून घेवून गैर कायद्याची मंडळी जमा केली. यावेळी आरोपी बाबा मिसगर याने नवनाथ पावले यास पकडून ठेवले व पोपट पावले याने नवनाथच्या डोक्यात कु-हाड मारली.
याच वेळी फिर्यादीच पत्नी उषा पावेल हिली आरोप नंदा पोपट पावले व सविता गणेश पावले यांनी पकडून ठेवून आरोपी गणेश पोपट पावले याने पाठीत मोटार सायकली चैन मारली. तेंव्हा फिर्य़ादीचा भाऊ, पुतण्या व आई, मुल व भावजी भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना मछ्चिद मनोज पावले, संगिता मछिद्र पावले ,बाबा मिगर,टिून मिस्कर , विठ्ल मिसगर यांनी लाथ्या बुक्याने व लाकडी दांडक्याने जोरदार मारहाण केली. या प्रकरणी वावी पोलीसांनी दंगा व दुखपतीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार मोरे हे तापस करीत आहे.