सिन्नर – सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सांगवी येथील विनायक होशिराम घुमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सभापती लक्ष्मणराव शेळके यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडीचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे गटाचे प्राबल्य असल्याने त्यांचा शब्द प्रमाण मानून सर्वानुमते सभापती पदासाठी विनायक घुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. दाखल करण्याच्या मुदतीत सभापती पदासाठी विनायक घुमरे आणि संजय खैरनार यांनी अर्ज दाखल केले. घुमरे यांच्या अर्जावर सुचक म्हणून विनायक तांबे तर अनुमोदक म्हणुन सुधाकर शिंदे यांनी स्वाक्षरी केली होती. छानणीत दोन्ही अर्ज वैध ठरले. माघारीच्या मुदतीत संजय खैरनार यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर विनायक घुमरे यांची सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ पाटील यांनी केली. बैठकीस उपसभापती संजय खैरनार, संचालक विनायक तांबे, सुधाकर शिंदे, सोमनाथ भिसे, शांताराम कोकाटे, सुनिल घुमरे, पंढरीनाथ खैरनार, सविता उगले, सुनिता बोऱ्हाडे, लता रुपवते, सुनिल चकोर, जगन्नाथ खैरनार, विजय सानप, सहकार अधिकारी आर. बी. त्रिभुवन, सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव आदी उपस्थित होते.
निवडीनंतर उपस्थित पदाधिकारी आणि समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती अॅड राजेंद्र चव्हाणके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ, शहराध्यक्ष सुभाष कुंभार, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, सुनिल नाईक, माजी सभापती राजेंद्र पमरे, विजय काटे, पंकज जाधव, देवा आवारे, संपत वाणी, तुषार गडाख, रोहन खालकर, सोमनाथ कोकाटे, सोपानराव उगले, प्रकाश वाणी, नवनाथ नरोडे, रामभाऊ लागणारे, उत्तम पदाडे, चंद्रशेखर खैरनार, विश्वनाथ घुमरे, मधुकर घुमरे, योगेश घोटेकर, सुदाम रायते, तुकाराम घुमरे, रविंद्र जाधव, दयानंद कोकाटे, दिलीप कोकाटे, भारत बोऱ्हाडे, आबासाहेब जाधव, कोंडाजी उगले आदी उपस्थित होते.
आमदार कोकाटे साहेबांनी सभापती पदी कामकरण्याची संधी देवून निष्ठावाण कार्यकत्याला कामाची पावती दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालकांना सोबत घेवून शेतकरी, व्यापारी हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही बाजार समितीचे कामकाज पारदर्शी करण्याची ग्वाही नवनिर्वाचीत सभापती विनायक घुमरे यांनी दिली.