मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर : एमआयडीसीतील कामगारांच्या प्रस्तावित रुग्णालय उभारणीच्या हालचालींना वेग

by India Darpan
मे 20, 2021 | 10:06 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210520 WA0194

– खाटांची क्षमता १०० असावी खा. गोडसे यांचे पथकाकडे आग्रही  मागणी
– माळेगाव, मुसळगाव एमआयडीसीतील भूखंडाची श्रम मंत्रालयाच्या पथकाकडून पाहणी

 सिन्नर : सिन्नर तालुक्यात माळेगाव, मुसळगाव या दोन महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींमधील  (एम.आय.डी.सी.) कामगारांना उच्च दर्जाचे आणि मोफत उपचार मिळावेत, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या  प्रयत्नातून गेल्या चार महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने तीस खाटांच्या स्वतंत्र रुग्णालय उभारणीला मंजुरी दिली आहे. माळेगाव, मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांच्या आरोग्य स्वास्थसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांवर मोफत उपचार करण्यात येणार असून सदर रुग्णालय उभारणीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आज गुरुवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत ई.एस.आय.सी.च्या विशेष पथकाने माळेगाव-मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आल्याने रुग्णालय उभारणीसाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून सदर प्रस्तावित रुग्णालयाची क्षमता ३० खाटांऐवजी १०० खाटांची व्हावी, अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी पथकाच्या प्रमुखांकडे केली आहे.

सिन्नर तालुक्यातील मुसळगाव, माळेगाव या दोन मोठ्या औद्योगीक वसाहती आहेत. येथील कारखान्यांमध्ये सुमारे पन्नास हजार कामगार सतत कार्यरत असतात. सिन्नर, मुसळगाव, माळेगाव, वावी याठिकाणी वर्षोनुवर्षे कामगार आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मात्र येथील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी केंद्र शासनाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर होता. मुसळगाव, माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील कामगार आणि कुटुंबियांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे, यासाठी कामगारांचा खासदार गोडसे यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. कर्मचाऱ्यांची मागणी न्यायिक असल्याने खा. गोडसे यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून जानेवारी महिन्यात केंद्राच्या श्रम मंत्रालयाने सिन्नर एमआयडीसीतील कामगारांसाठी ३० खाटांच्या रुग्णालय उभारणीला मान्यता दिलेली आहे. आजमितीस प्रस्तावित रुग्णालयात तीस खाटांची मंजुरी असली तरी कोरोना प्रादूर्भाव लक्षात घेवून सदर रुग्णालयाची व्याप्ती शंभर खाटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

सदर प्रस्तावित रुग्णालयासाठी जागा मिळविण्यासाठी खा. गोडसे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी मांढरे यांनी प्रस्तावित रुग्णालयासाठी सिन्नर तालुक्यातील मोह आणि मुसळगाव याठिकाणी शासकीय भूखंड असल्याचे स्पष्ट केले होते. सदर प्रस्तावित रुग्णालय उभारणीच्या कामासाठी हालचाली सुरु झाल्या असून आज गुरुवारी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह ई.एस.आय.सी.चे डेप्युटी डॉयरेक्टर निश्चलकुमार नाथ यांच्या पथकाने सदर भूखंडांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे युवानेते उदय सांगळे, तहसिलदार राहुल कोताडे, श्रम मंत्रालयाचे निश्चचलकमुार नाथ, एस. के. पांडे, जितेंद्र खैरनार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या रुग्णालयाचा फायदा औद्योगिक वसाहतींमधील हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना उच्च दर्जाचे उपचार जलद व मोफत मिळणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर सीबीआयने न्यायालयात दिले हे स्पष्टीकरण

Next Post

कोरोना रोखण्यासाठी अहमदनगरच्या उपाययोजनांची प्रधानमंत्री मोदींनी घेतली दखल

India Darpan

Next Post
photo 10

कोरोना रोखण्यासाठी अहमदनगरच्या उपाययोजनांची प्रधानमंत्री मोदींनी घेतली दखल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011