सिन्नर – छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ठाणगाव येथे ठाणगाव विकास मंचच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ४१ रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात झाली . याप्रसंगी उपसरपंच शेखर कर्डीले, प्रशांत काकड, ए. टी. शिंदे, राहुल आव्हाड, सोमनाथ शिंदे, संजय शिंदे, विनोद आंबेकर, योगेश शिंदे, शिवराम शिंदे डॉ. अनिल घनवट, डॉ. नेहा लांडगे उपस्थित होते.
ठाणगाव विकास मंचच्या वतीने रक्तदान शिबिराचे हे चौथे वर्ष होते. यावर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी रक्तदान शिबिरास ठाणगाव परिसरातून उस्फुर्त प्रतिसाद भेटला. ऐकेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. तरुणांचा या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी जयराम शिंदे, राहुल शिंदे, अमित शिंदे, अक्षय गोसावी, यज्ञेश काळे, प्रतीक शिंदे, प्रमोद शिंदे, विशाल दराडे, किशोर शिंदे, आण्णा गुंड, प्रदीप शिंदे, सागर शिंदे, सुधीर मंडोळे, सुमेध आव्हाड, महेंद्र शिंदे तसेच अर्पण ब्लड बँकचे नाशिक कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.