सिन्नर- तालुक्यातील पंचाळे येथील सिन्नर भूषण सुर्यभानजी गडाख प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. गडाख (नाना)यांच्या प्रतीमेचे पुजन करत झाला. निमाचे संचालक, संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या कार्यक्रमाचे सुञसंचलन विद्यार्थीनींनी केले. प्रास्थाविक व्ही. बी. पवार यांनी केले. स्काऊट जिल्हा समुपदेशक शिरोळे सर यांनी नानांच्या कार्याचा परीचय करुन दिला.
श्री.गडाख एन.डी यांनी गुरुचे महात्म्य हे स्वरचीत गजल काव्य सादर केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सुंदर भाषणे सादर केली. राजेश गडाख यांनी उपस्थित सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत शिक्षक व विद्यार्थी ऋणानुबंध सांगितला. उत्तम ज्ञान संपादन करुन शाळेचा, आई-वडीलांचा, देशाचा नावलौकिक वाढवावा व एक सुजाण नागरीक बनावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरात एन.ए. यांनी केले. माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे.एस.पी., मार्गदर्शक गडाख आर.एस., उच्च माध्यमिक विद्यालयाचे विभाग प्रमुख पी.पी.शेलार, श्रीमती.गायकर बी.सी.यांच्यासह विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षक्केत्तर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी ऑनलाईन उपस्थित होते.