सिन्नर- रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नरचा पदग्रहण सोहळा कोव्हीडच्या पार्श्भूमीवर निवडक सदस्यांच्या उपस्थीतित नुकताच पार पडला. या समारंभात वर्ष २१-२२ साठी किरण भंडारी यांनी अध्यक्ष व किरण वाघ यांनी सचिवपदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी व्यापीठावर डिस्ट्रिक्ट ३०३० चे गव्हर्नर रमेश मेहेर, डॉ. आवेश पलोड, प्रमुख पाहुणे म्हणून कमलाकर टाक, मावळते अध्यक्ष महेश बोऱ्हाडे, मावळते सचिव अनिल गोरडे उपस्थित होते. मावळते अध्यक्ष महेश बोऱ्हाडे यांनी मागिल वर्षाच्या सामजिक कामाचा आढावा घेतला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष किरण भंडारी यांनी आपल्या मनोगतात रोटरीच्या माध्यमातुन सामजिक, वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रात उपक्रम राबविणार असल्याची माहिती दिली. रिंगप्लस अक्वाचे प्लांटहेड सतीश नेहे यांनी सीएसआर कसा ऊपलब्ध करता येतो व त्याचे क्लबसाठी महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिली व क्लबसाठी सीएसआर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. रमेश मेहेर यांनी रोटरी इंटरनॅशनलचे जागतिक पातळीवर काम कसे चालते यावर सविस्तर माहिती दिली. रोटरी क्लबमध्ये स्रीयांचा सहभाग असावा, त्यांच्या कामाचा, अनुभव क्लबची उंची जागतिक पातळीवर वाढविण्यासाठी उपयोगी पडेल असे ते म्हणाले. मावळते अध्यक्ष महेश बोऱ्हाडे व अनिल गोरडे यांनी मागील वर्षात सामजिक क्षेत्रात काम केलेल्या क्लबच्या सदस्यांचा, सामाजिक पर्यावरण संवर्धन करणाऱ्या वनप्रस्थ फाऊंडेशन व ग्रीन रीव्होलुशन यांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे, शदादा देशमुख , नाना शेवाळे , संजय कलंत्री, ओमकार महाले, गोंदेश्वर रोटरी क्लबचे सर्व सदस्य , वनप्रस्थ फाऊंडेशन सिन्नर व ग्रीन रीव्होलुशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय नवले, शशिकांत नवले व राहुल शिंदे इत्यादी नव्याने सदस्य म्हणून रोटरी परिवारात सामिल झाले. सूत्रसंचलन सौ. सोनल राजेश वाजे व सोमनाथ वाघ यांनी केले.