सिन्नर- सिल्वर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एस.एस.सी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कु. धनश्री तुकाराम शिंदे व अनुष्का भाऊसाहेब उगले (९६.६०%) यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली. प्रणव दादासाहेब बर्गे (९२.४०%) याने दि्तीय तर साक्षी सोमनाथ सदगीरने (९०:८०%) तृतिय क्रमांक मिळवला.
सिल्वर लोटस शाळेतील १९ विद्यार्थी एस.एस.सी परीक्षेला बसले होते त्यापैकी विशेष श्रेणीत १३, प्रथम श्रेणीत ४ विद्यार्थी, दि्तीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिल्वर लोटस स्कूलचे संस्थापक दिलीप बिन्नर व संचालिका सौ. सोनल बिन्नर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. शाळेचे कॅम्पस डायरेक्टर एल .डी ढोनर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्या श्रीमती मनीषा गुरुळे, बाल गटाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती गंगावणे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती कविता डावखर यांच्यासह सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.