सिन्नर- पंचायत समितीच्या सभापतीपदी गुळवंच गणाच्या शिवसेना पक्षाच्या सदस्या सौ. रोहिनी कांगणे यांची आज (दि.16) बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समितीवर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. मावळत्या सभापती त्यांचा सत्कार करताना शिवसेना जिल्हा प्रमुखशोभा बर्के यांनी आपल्या सहकाऱ्यांना नेतृत्वाची संधी मिळावी म्हणून सभापती पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. हे रिक्त पद भरण्यासाठी आज पंचायत समितीच्या सभागृहात सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात निर्धारित वेळेत कांगणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीचे वृत येताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सौ. कांगणे यांचा सत्कर करण्यात आला. यावेळी उदय सांगळे, उपसभापती संग्राम कातकाड़े, मावळत्या सभापती शोभा बरके, सदस्या वेणूताई डावरे, संगीता पावसे, सुमन बर्डे, भगवान पथवे, जगन पाटील भाबड,संजय सानप, अशोक डावरे, रामनाथ पावसे, पिराजी पवार, समाधान कांगणे, भाउदास शिरसाठ यांच्यासह शिवसैनिक उपसस्थित होते.