सिन्नर- शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून सिन्नर तालुक्यातही शिवसंपर्क अभियानास उद्या १६ जुलै पासून नायगाव गटातील चिंचोली गावातून सकाळी ९ वाजेपासून सुरुवात होणार आहे. या अभियानात संघटनवाढ व मजबुती संदर्भात उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शिवसैनिकांच्या अडचणी समजून घेऊन त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
चिंचोली नंतर मुसळगाव व देवपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी १७ जुलै रोजी दोडी, चास , सोनांबे व सिन्नर शहरात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर अभियानात शिवसेना उपनेते बबनराव घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर,माजी आ.राजाभाऊ वाजे, सुनिल बागुल, वसंत गिते, विनायक पांडे, दत्ताजी गायकवाड, उदय सांगळे यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. सदर अभियानात तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक यांनी केले आहे.