पोटे यांचे कोरोनाच्या पहिल्या लाटेत निधन झाले असून त्यापूर्वी सिन्नर तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात जलसिंचनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या मोठ्या कामाची दखल घेत स्व. पोटे यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाने आज पोटे यांच्या पत्नी मनिषा पोटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. स्व. चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देण्यात येणारा सन २०२० चा प्रथम क्रमांकाचा जलभूषण पुरस्कार पोटे यांना देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
येत्या मंगळवारी १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पुरस्कार स्विकारण्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीसह उपस्थित राहण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे.