सिन्नर:- महाराष्ट्र राज्यातील कोविड महामारीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या निवडक प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी यांना दिला जाणारा राज्यस्तरीय हास्यप्रबोधन कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार नुकताच सिन्नरचे तहसीलदार राहुल यांना कोताडे यांना जाहीर झाला. अॅडिशनल कलेक्टर दत्तप्रसाद नडे आणि उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सन्मान पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
कोरोना महामारीत अव्याहत २४/७ कार्यरत राहुन तालुक्यातील असंख्य कोरोना बाधित रूग्णांना संजीवनी देणारे अदृश्य असंख्य हात सिन्नरकरांचे आरोग्य जपण्सासाठी झटत होते. त्यातीलच एक चेहरा म्हणजे सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे. अकल्पित आणि भयकंप उडविणाऱ्या कोरोना महामारीने जगासोबत सिन्नर शहरातही धडकी भरविली होती. आरोग्य यंत्रणा कोलमडून पडण्याच्या वाटेवर असताना प्रशासकीय यंत्रतेनेचे मुख्य सुत्रधार म्हणून राहुल कोताडे यांनी सिन्नरकरांसाठी मोलाची कामगिरी केली, ती चर्चेचा विषय झाली होती. एक तरूण अधिकारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव ओतून, सिन्नरलाच आपले कुटुंब मानुन धैर्याने लढताना सिन्नरकरांनी बघितला. तेव्हाच प्रशासनातील एखादा अधिकारी सर्वोत्कृष्ट नेतृत्व करत तालुका हाच परिवार मानत जेव्हा लढतो तेव्हा त्याचे रिझल्ट उत्तमच येणार यात शंकाच नाही.
सामान्य सिन्नरकरांना ख-या अर्थाने न्याय देताना राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील धुरंधरांना हाताशी धरत न्यायाच्या समतोल बाजू लढत इतके अद्वितीय काम करतो हे बघुन नागरीक सुखावले ते राहुल कोताडे साहेब यांच्या कणखर भुमिकेने, त्यांनी प्रशासन यंत्रणा उत्तम सांभाळल्यानेच. चांगल्या कार्याचा व्यक्तीचा, संस्थाचा सहभाग जेव्हा एकजुटीचं दर्शन घडवतो, तेव्हा हास्यप्रबोधन हा जागतीक परिवार अशा कार्याची अवश्य दखल घेत आलाय.
नुकताच सिन्नर शहरात तहसीलदार राहुल कोताडे यांना हास्यप्रबोधन कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार तहसील कार्यालयात आदरपुर्वक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी हास्यप्रबोधन परिवारचे अॅडमीन अनिल गडाख गुरुजी, संचालक तापी खोरे वित्त महामंडळ जळगावचे बाळासाहेब घोरपडे, सहाय्यक संचालक वित्त हेमंत जाधवर, कॅलिओग्राफर एकनाथ नाईकवाडे, उद्योजक संदिप गुजराथी, दुय्यम निबंधक सुधाकर मोरे, ऊद्योजिका हिराताई दराडे, तंञस्नेही अध्यापक गोरख सोनवने, बाळासाहेब पाटील, सुनील आंबरे, पांडुरंग कांडेकर, संस्कार जाधवर, गणेश वामन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन अॅडमीन हास्यप्रबोधन अनिल गडाख गुरुजी यांनी केले. आभार बाळासाहेब घोरपडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हास्यप्रबोधन परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.