सिन्नर– तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने ४३ गरजू विद्यार्थ्यांना वह्या ,पुस्तके ,चप्पल , बूट ,कंपास पेटी ,पेन ,खाऊ, खेळण्या अशा विविध शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधन असलेले कान्होजी आंग्रे यांच्या व भारतीय संस्कृती आणि युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीचे औचीत्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रामदास भोर यांनी मुघलांसह ब्रिटिशांना सळो की पाळो करुन सोडनाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जिवनकार्याबद्दल माहिती दिली.
यावेळी मुकुंदराव काकड अभियंता, मुंबई, माजी सरपंच माधवशेठ काकड, ठाणगाव विकास सोसायटीचे चेअरमन बाबुराव शिंदे, अर्जुन आव्हाड, डॉ. भाऊसाहेब शिंदे, वसंतराव आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, आनंदरावजी गुंड, अंकुर काळे, भिमराव फोडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकुंद काकड, ज्ञानेश्वर काकड, अर्जुन आव्हाड, गोपीनाथ काकड, राजेंद्र काकड, बाळासाहेब गोसावी यांनी परिश्रम घेतले. जनसेवेचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, प्राध्यापक श्रीमती केदारी, प्रा. मस्के, प्रा. भोजने, शंकर आमले, सागर भोर, आत्माराम शिंदे, अरुण वालझाडे, विजया मंडोळे रामदास मंडोळे व सलमान मनियार यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी घुटेवाडी या छोटेखानी गावातील २० तर ठाणगावमधील २३ मुलांना शालेय साहित्य वाटण्यात आले. कोरोनाच्या वातावरणात जनसेवा सेवाभावी संस्थेच्या अशा विविध उपक्रमांचे परिसरातून कौतुक होत आहे.