सिन्नर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे ३० वर्षा वरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे सुरु केले असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे दिव्यांग नागरिकांस लस घेताना रांगेत उभे राहावे लागू नये व गर्दीमुळे दिव्यांग नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून त्यांना प्राधान्य देऊन विनाअडथळा लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सिन्नर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील केवळ दिव्यांग बांधवांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जनता विद्यालय, सिन्नर येथे विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले.
सिन्नर शहरात वास्तव्यास असलेल्या एकूण दिव्यांग बांधवांपैकी ११९ दिव्यांग बांधवाना एकाच दिवशी लस देण्यात आली. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, मुख्याधिकारी संजय केदार, डॉ. प्रशांत खैरनार यांचे मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, वर्षा साळुंके, कांचन सानप, पुष्पा वैलकर, अनुसया भांसी, यांनी समन्वयाचे कार्य केले.