सिन्नर- तालुक्यातील सोनांबे उपकेंद्रात आज सकाळी ११ वाजता दिव्यांग लोकांसाठी वय वर्ष १८ च्या पुढील लोकांची RAPID ANTIGEN TEST करून त्यांना COVIDSHILD ची लस देण्यात आली. यावेळी अपंग दिव्यांग लोकांना कोरोना विषयक आरोग्यदायी माहिती देवून तसेच लशी विषयी भीती व गैरसमज दूर करून मार्गदर्शन करण्यात आले.
दीव्यांग लोकांना लस देण्यात आली. तसेच त्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. याप्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी (कोनांबे) सागर गायकवाड व आरोग्य सेविका श्रीमती अलंका उबाळे, संदीप दिवटे (आरोग्यसेवक, सोनांबे उपकेंद्र) यांनी लसीकरणाचे काम पाहिले.
आशासेविका कल्पना सुर्यवंशी, दिपाली व्यवहारे, ललिता डगळे, मनीषा खेताडे, अनिता कडभाने यांनी यावेळी मोलाची जबाबदारी निभावली.