सिन्नर – राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात .अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राज्यांतर्गत पीक स्पर्धा रब्बी हंगाम सन २०२० – २०२१ राबवली. या स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील गहू या पिकासाठी ५३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेची राज्यस्तरीय निवड नुकतीच झाली असून या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर मौजे दहीवाडी महाजनपूर येथील प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब नामदेव आरोटे यांनी ९० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन घेऊन राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
रविवारी राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार हे नाशिक विभागाच्या दौऱ्यावर असताना सिन्नर येथे आले असता त्यांच्याकडून महाजनपूरचे शेतकरी आप्पासाहेब नामदेव आरोटे यांच्याकडून गहू पीक उत्पादनात त्यांनी अवलंब केलेल्या बाबींविषयी माहिती करून घेतली. तसेच उजनी येथील चंदन शेती व डाळिंब सोलापूरी लाल या वानाची यशस्वी शेती करणारे रामहरी मोहन सुरसे यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणा-या कृषी सहाय्यक श्रीमती वंदना क-हाडे, कृषी पर्यवेक्षक दोडके , मंडळ कृषी अधिकारी एस. पी. पाटील ,तालुका कृषी अधिकारी आण्णासाहेब गागरेयांचेही अभिनंदन केले .
यावेळी विभागीय कृषि सह संचालक संजीव पडवळ , विभागीय कृषि अधीक्षक अधिकारी सुनील वानखेडेस , जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषि अधिकारी अण्णासाहेब गागरे , कृषि सहाय्यक अर्चना चौधरी, वंदना कऱ्हाडे, प्रदीप भोर, दिपक कुसळकर, दिलीप नामदेव आरोटे, नानासाहेब संधान, योगेश संधान, सुनील गाढे, मनोज गाढे, लक्ष्मण बर्गे, हरिराम गाढे सर , निखील बर्वे, अशोक वाजे आदी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.