सिन्नर- तालुक्यातील ठानगव येथील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने, छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी कातकरी वाडीतील गरीब व होतकरू गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या ,चप्पल, कंपास पेटी, पेन ,मास्क, खाऊ आदी साहित्याचे वाटप जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले कातकरी समाजातील २० विद्यार्थी लाभार्थी म्हणून निवडण्यात आले.
कार्यक्रम जनसेवेचे अध्यक्ष रामदास भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला, छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन, सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती नामदेव राव शिंदे पाटील व माजी सरपंच माधव शेठ काकड,अमित शेठ पानसरे बबन दादा काकड, अर्जुन नाना आव्हाड, प्रगतशील शेतकरी अशोक काकड, अशोक कचरे सर (प्राध्यापक), शंकरराव आमले जनसेवा उपाध्यक्ष हिरामण आमले, सागरभाऊ भोर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी व विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठी दानशूर व्यक्ती, अमित शेठ पानसरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त, जनसेवा मित्र मंडळाला आर्थिक मदत केली.
छत्रपती शाहू महाराज हे भारतीय आरक्षणाचे व सामाजिक न्यायाचे जनक आहेत. त्यांनी समाजातील प्रत्येक बहुजन घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले म्हणूनच आजचा हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. हे कारणाने ते पाहिले राजे होते त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच या पुरोगामी महाराष्ट्रात आज शिक्षणाची चळवळ उभी राहिली आहे. ते एक थोर समाज सुधारक होते असे प्रतिपादन प्राध्यापक कचरे यांनी केले. यावेळी जनसेवेचे सदस्य अनिल आव्हाड अशोक हिलम,आशेक काकड अंबादास गोसावी संजय काकड यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.