सिन्नर – नगरपरिषद सिन्नर महिला व बालकल्याण समिती, रोटरी क्लब ऑफ सिन्नर, दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांचे संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना नव्याने उद्योग व व्यवसाय कसा सुरू करण्यासाठी पेपर बॅग व केक बनविणे बाबत एक दिवशीय कार्यशाळा सिन्नर नगर परिषद कार्यालयात नुकतीच पार पडली.
महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योति वामने, नगरसेविका सुजाता तेलंग, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड, शुभ्रा आर्ट गॅलरीचे संचालक परिश जुमनाके यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. महिलांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व नव्याने उद्योग व्यवसाय उभा करून आपल्या कुटुंबास आर्थिक हातभार लावावा असे आवाहन सभापती वामने यांनी केले. महिलांनी उद्योगा भिमुख हावे. कोरोना कालावधीत विविध प्रकारचे घरगुती उद्योग सुरु करावेत असे मत नगरसेविका तेलंग यांनी व्यक्त केले.
कोरोना कालावधीत अनेकांचे व्यवसाय बंद पडले असून महिलांना नव्याने उद्योग व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे रोटरीचे अध्यक्ष गायकवाड म्हणाले.पूनम भंडारी यांनी केक बनवण्याचे प्रशिक्षण दिले व परिश जुमनाके यांनी पेपर बॅग बनवण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी उपस्थित महिलांनी विविध प्रकारच्या पेपर बॅग व केक बनवण्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी प्रशिक्षण झाल्यावर समाधान व्यक्त केले. सदर प्रशिक्षणात राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील निवडक महिलांनी सहभाग घेतला होता. निशांत माहेश्वरी यांनी प्रशिक्षकांचे व बचत गटातील सदस्यांचे आभार मानले. यावेळी रोटरीचे माजी उप प्रांतपाल कैलास क्षत्रिय, नाना भगत, वैभव मुत्रक, अनुराधा लोंढे, नीलिमा दशपुते, अश्विनी वैद्य, वंदना जाधव,निर्मला चितळकर, आशा भोसले, ज्योती कोळी, कविता सोळंके, पायल दुबे, भारती दिघे, उज्वला लोखंडे यांचे सह महिला उपस्थित होत्या.