सिन्नर महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा
सिन्नर – सिन्नर महाविद्यालयात आज दि. २१ जून “जागतिक योग दिन” साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ होते. यावेळी प्रमुख अथिती म्हणून पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी राजेंद्र नन्नवरे, सौ. शीला नन्नवरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना योग विषयक मार्गदर्शन केले, तसेच योगासने आणि प्राणायाम याची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. प्राचार्य डॉ. रसाळ यांनी योग आणि योगासने यांचे महत्त्व सांगितले व उपस्थिताना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपपाचार्य प्रा. आर. व्ही. पवार, उपपाचार्य डॉ. डी. एम. जाधव,प्रमुख प्रा. सुरेश इंगळे, प्रा. पी. एम. खैरनार, प्रा. सी. जे. बर्वे, प्रा. जी. पी. चिने रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.बी. कर्डक, प्रा.योगेश भारस्कर, प्रा. श्रीमती जे. जे. भांगरे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम विद्यापीठ आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून संपन्न झाला.
………………..
जि. प.मुसळगाव शाळेत ऑनलाईन तासिकेत योगा दिन साजरा
सिन्नर- तालुक्यातील मुसळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सातवा आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा केला . कोरोना परिस्थितीमुळे शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र थांबलेले नाही . जिल्हा परिषद मुसळगाव शाळेतील सर्वच शिक्षक वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून विविध उपक्रम पोहचवत असतात. यापैकीच एक उपक्रम म्हणजे जागतिक योगा दिन.
शाळेतील पदवीधर शिक्षिका वैशाली सायाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगा प्रात्यक्षिके झूम ॲपवर ऑनलाइन पद्धतीने अतिशय सुंदर सादर केली. इयत्ता सहावीच्या वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांनी योगा तासिकेचा लाभ घेतला. सायाळेकर यांनी या ऑनलाईन योगा उपक्रमात मानेचे, हाताचे सूक्ष्म व्यायाम प्रकार, कटीसंचलन, घुटना संचलन, खडे आसन प्रकारातील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, नटराजासन, सूर्यनमस्कार, बैठे आसन प्रकारातील दंडासन, भद्रासन, वज्रासन शशांकासन, मेडिटेशन प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक घेतले. शांती पाठाने समारोप करण्यात आला. मुख्याध्यापक वसंत गोसावी, शिक्षक अनिता येवले, उषा चव्हाण, जितेंद्र नंदनवार, कल्पना जगताप, नवनाथ हांडगे, श्रावण वाघ, अशोक कासार, रोहिणी राजगुरू, रवींद्र चौरे, स्वाती येवले, स्वाती रोहोकले, विकास गुंजाळ, विशाखा वर्पे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे, केंद्रप्रमुख हेमंत भुजबळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे व पालकांनी ऑनलाईन योगा उपक्रमाचे कौतुक केले.
…….