योगा करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली, रवींद्र नाईक
सिन्नर -एस .जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त ऑनलाईन योगा प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २१ जून २०२१ हा दिवस सातवा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करतात या निमित्तानं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित १५ जून ते २१ जून या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त लाईव्ह झूम ॲप वर योगा प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन एस.जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक ,हेमांगी पाटील जिल्हा संघटक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक. सेक्रेटरी राजेश गडाख माध्यमिक लोक शिक्षण मंडळ सिन्नर. विश्वनाथ शिरोळे जिल्हा समुपदेशक जिल्हा स्काऊट गाईड कार्यालय नाशिक, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे , शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय कुदळे यांनी केले .
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रवींद्र नाईक साहेब यांनी शाळेने कोरोना सदृश्य परिस्थिती मध्ये मागील एक वर्षापासून राबवलेल्या ऑनलाइन योगा अभ्यास उपक्रमाचे कौतुक केले. नाशिक जिल्ह्यामध्ये खास वर्षभर विद्यार्थ्यांसाठी योगा राबविणारी एस.जी. प्राथमिक ही एकमेव शाळा आहे.योगाचे महत्व विशद करताना शरीर, मन ,आत्मा यांना जोडणारा व्यायाम प्रकार म्हणजे योग होय .रोज योगा करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.
अभ्यासासाठी शरीर व मन सुदृढ व निरोगी असणे खूप आवश्यक आहे .हे काम कोरोना काळात वर्षभर योगा अभ्यास उपक्रम राबवून एस. जी .पब्लिक स्कूल शाळेने अतिशय छान प्रकारे काम केले. राजेश गडाख साहेब ,शाळेतील मुख्याध्यापक उदय कुदळे ,योगा अभ्यास मार्गदर्शन करणारे बापू चतुर तसेच सर्व शिक्षकांचे, सहभागी विद्यार्थी व पालकांचे, अभिनंदन केले. हेमांगी पाटील यांनी एस.जी.शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम हे खरोखरच स्तुत्य उपक्रम असून त्यात नावीन्यता असते,विद्यार्थी हित लक्षात घेऊन राबविले जातात याचे मला खूप आनंद वाटतो .
शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र चालू आहेत.शाळेतील मुलांसाठी योगा अभ्यास, परिपाठ ऑनलाइन अभ्यास ताशीका, विविध उपक्रम या माध्यमातून विद्यार्थी व पालक शाळेशी जोडलेले आहेत. या कोरोना काळातही अभ्यासाबरोबर विद्यार्थी मानसिक दृष्ट्या सक्षम राहणे तेवढेच आवश्यक आहेत. आणि यासाठीच शाळेने विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम चालू केला असे आपल्या मनोगतात राजेश साहेब यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन योगा प्रात्यक्षिके करून दाखवत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमांमध्ये शाळेतील योगा मार्गदर्शक बापू चतुर यांनी योगा प्रात्यक्षिक सादरीकरण केले. यामध्ये ग्रीवा चलन, हाताचे सूक्ष्म व्यायाम प्रकार, स्कंद संचलन ,कटी संचलन ,घुटना संचलन ,खडे आसन प्रकारातील ताडासन ,वृक्षासन अर्ध कटिचक्रासन ,बैठे आसान प्रकारातील, भद्रासन ,दंडासन ,वज्रासन, शशांक आसन, पाठीवरील आसन प्रकारातील उत्तानपादासन ,पवनमुक्तासन, नौकासन ,पोटावर झोपून करावयाचे आसन प्रकारातील शलभासन ,धनुरासन, मकरासन, प्राणायाम, मेडिटेशन, इत्यादी प्रात्यक्षिके घेऊन,योगा संकल्प व शांतीपाठ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
ऑनलाइन कार्यक्रमाचे होस्ट म्हणून शाळेतील शिक्षक सुधाकर कोकाटे यांनी काम पाहिले.प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे ,सोमनाथ थेटे, भास्कर गुरुळे, पांडुरंग लोहकरे, बापू चतुर ,सागर भालेराव ,जिजाबाई ताडगे ,जयश्री सोनजे वृषाली जाधव ,सतीश बनसोडे,अमोल पवार, ,कविता शिंदे ,सुधाकर कोकाटे ,पदमा गडाख,योगेश चव्हाणके,निलेश मुळे, शिवाजी कांदळकर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.