सिन्नर – मराठा आरक्षणासाठी खा. छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून, कोल्हापूरनंतर येत्या सोमवारी (दि. २१) नाशकात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात मैदानावर सकाळी १० वाजता हे आंदोलन होणार असून या आंदोलनात सिन्नर येथुन शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती सिन्नर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पर्याय शोधून मराठा समाजाचे आरक्षण पुनर्स्थापित करण्याची जबाबदारी राज्याबरोबरच केंद्र सरकारची देखील आहे. या भूमिकेवर समाज ठाम असून या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बोलते करण्याचे आंदोलन समाजाने खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता निश्चित करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करतानाच काळ्या रंगाची वेशभूषा, दंडावर काळ्या रंगाची फीत, काळा मास्क परिधान करून मराठा समाजाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील. आंदोलक मूक राहतील. मात्र, या आंदोलनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.
.
आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राजेंद्र चव्हाणके, कृष्णाजी भगत, भाऊसाहेब शिंदे, विठ्ठल ऊगले, नामदेव कोतवाल, बाळासाहेब हांडे, आण्णासाहेब गडाख, दिगंबर देशमुख, रामनाथ डावरे, ज्ञानेश्वर कु-हाडे, राजाराम मुंगसे, सविता कोठुरकर, कल्पना रेवगडे, किशोर देशमुख, शाहीर स्वप्निल डुंबरे, सचीन उगले, इंद्रभान गाडे, शशिकांत गाडे, विठ्ठल जपे यांनी केले आहे.