सिन्नर – येथील साहित्यिक किरण भावसार यांच्या मित्राची गोष्ट या कादंबरीचा प्रकाशन सोहळा कामगार शक्ती फाउंडेशन व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २० जून रोजी दुपारी तीन वाजता कामगार शक्ती फाउंडेशनच्या कार्यालयात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. संतोष खेडलेकर आणि विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्या मनीषा उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक किशोर राठी असणार आहेत अशी माहिती कामगार शक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अनिल सरवार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सिन्नर शाखेचे कार्याध्यक्ष रविंद्र कांगणे यांनी दिली.
पुणे येथील चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील या बहुप्रतीक्षित कादंबरीच्या प्रकाशनासाठी साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.