सिन्नर -येथील माळेगाव एमआयडीसीतील “ॲडव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी”ने एन्झाईम आणि प्रोबायोटिक्स यांच्या वापरातून बनवलेले इम्युनिटी बंडल सप्लिमेंट रोगप्रतिकारक शक्तीच्या बळकटीसाठी औषधांसोबत पूरक ठरत आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा अशक्तपणा घालवण्यासाठी हे सप्लिमेंट चांगले काम करत आहे. नासिक जिल्ह्यातील कंपनीने बनवलेला इम्युनिटी बंडलचा हा फाॅर्म्युला नाशिककरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
कोविडनंतर होत असलेल्या त्रासाबाबत सध्या वैद्यकीय संशोधन सुरू आहे. डॉ. रोहित पराते आणि डॉ. नेहा शहा यांनी याबाबत आपला शोध प्रबंध सादर केला असून तो मेडिकल जर्नल ऑफ क्लिनीकल ट्रायल अँड केस स्टडीज मध्ये प्रकाशित झाला आहे. सदर संशोधनानुसार त्यांनी रुग्णांना एन्झाईम (Immunoseb) आणि प्रोबायोटिक्स (Biome ultra) हे सप्लिमेंट देऊन चाचण्या केल्या. या चाचण्या अतिशय लाभदायी ठरल्याचे त्यांनी आपल्या संशोधनात म्हटले आहे. या संशोधनानुसार रुग्णांच्या शरीरातील थकवा १५ दिवसांच्या आत कमी होऊन त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे.
कोविडच्या आजारातून बरे झाल्यानंतर आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. मात्र, अनेक रुग्णांमध्ये, थकवा, झोप न लागणे, आप्तांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली मानसिक अस्वस्थता, छातीत धडधडणे, थरथरणे, घाम येणे आदी समस्या आढळून येत असल्याचे श्रीरामपूर येथील मानसिक रोग तज्ञ डॉ. संकेत मुंदडा यांनी म्हटले आहे. कोविडचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणजे आपण पूर्णपणे बरे झालो असे नाही. भोपाळ येथील डॉ. रोहित पराते या एमडी मेडिसिन यांच्या निरिक्षणानुसार कोविडनंतर अनेक रुग्णांमध्ये अशक्तपणा, कोरडा खोकला, अंगदुखी, भूक न लागणे व बद्धकोष्टता अशी लक्षणे आढळून येत आहेत. डॉ. कुलदीप कटारिया यांच्या अनुभवानुसार कोविडनंतर रुग्णांमध्ये झोपेचा त्रास, छातीत जळजळ अशी लक्षणे आढळून येत आहेत. ॲडव्हान्स्डचे इम्युनिटी बंडल सप्लिमेंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून ती औषधे नाहीत. मात्र, औषधांसाठी पूरक ठरत आहेत. ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करत असल्याचे डॉ. कटारिया यांनी म्हटले आहे.
अभ्यासात या सप्लीमेंट दुष्परिणामरहित असल्याचे आढळून आले आहे. कोरोना महामारीच्या काळात बरे होऊनही लांबलेल्या अशक्तपणाचे न उलगडलेले कोडे सोडविण्यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू होते. याच्यावर एन्झाईम आणि प्रोबायोटीक्सच्या सेवनाने रूग्णांना बरे होण्यास मदत मिळू शकते असे डॉ. नेहा शहा (PhD, USA) यांनी म्हटले आहे.