सिन्नर – रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरच्या अध्यक्षपदी किरण भंडारी, सेक्रेटरीपदी किरण वाघ तर खजिनदारपदी कैलास शिंदे यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. जुलै महिन्यात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ होणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष महेश बोऱ्हाडे यांनी दिली.
रोटरी क्लब नेहमीच सामाजिक कामात देशातच नव्हे तर जगात अग्रेसर आहे. रोटरी क्लब हा सर्वांना काम करण्याची संधी देत असतो . दरवर्षी नविन सदस्याला अध्यक्षपद, सेक्रेटरी पद व ईतर पदे दिली जातात. प्रत्येक अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व सदस्य हे आपली दैनंदीन कामे, व्यवसाय, नोकरी सांभाळून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात. भंडारी यांनी पदग्रहण सोहळा साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून वाचणारा खर्च व जमा होणारा निधी तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवण्याचा संकल्प केला आहे.
या वर्षभरात कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. रुग्णांना आलेल्या अनुभवांचा विचार करून कोरोनाला रोखण्यासाठी सदस्यांच्या मदतीने अभियान राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्लबची ऑनलाईन बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या ऑनलाईन बैठकीस मावळते अध्यक्ष महेश बोऱ्हाडे, सेक्रेटरी अनिल गोरडे, संस्थापक सतिश नेहे, सोमनाथ वाघ, बाळासाहेब सदगिर, राजेश वाजे, निलेश काकड, सुधिर जोशी यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.