खासदार गोडसे यांच्या प्रयत्नातून क्यु.पीड. कंपनीच्या सी.एस.आर. मशिन उपलब्ध
सिन्नर : महिलांना मासिक पाळीत भेडसाविणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या सदृढ आरोग्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामपंचायत अंतर्गत सॅनिटरी नॅपकीन मशीन, डिस्पोजेबल मशिन कार्यान्वित करण्याच्या हेतूने जवळपास ७० हून अधिक मशिचे लोकार्पण आज सोमवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सिन्नर पंचायत समिती कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आज सोमवारी सकाळी अकरा वाजता सिन्नर पंचायत समितीत तालुक्यातील महिलांना मासिक पाळीत भेडसाविणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने चांगले असलेल्या सॅनिटरी नॅपकिन व डिस्पोजबेल मशिनचे लोकार्पण करण्यात आले. सिन्नर येथील येथील क्यु. पीड. कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून ही मशिन उपलब्ध झाली आहेत. तब्बल १२ लाखांचा निधी मंजूर झाल्याने तालुक्यातील ८० गावांमध्ये हे सॅनिटरी मशीनसह डिस्पोजेबल मशीन बसविण्यात आले आहेत. सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत वेळोवेळी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी खा. गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून युवानेते उदय सागंळे, सभापती शोभाताई बरके, नगराध्यक्ष किरण डगळे, उपसभापती सग्रांम कातकाडे, शिवसेना तालुका प्रमुख सोमनाथ तुपे, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, शहर प्रमुख शरद घरटे आदींसह पंचायत समिती सदस्य जगन पाटील-भाबड, पं. स. सदस्य सुमन बर्डे, पं. स. सदस्य वेणूताई डावरे, पं. स. संगीता पावसे, पिराजी पवार, संजय सानप, युवासेना तालुकाप्रमुख विजय कटके, शिवसेना उपतालुका प्रमुख दत्ताराम डोमाडे, प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, नगरपालिका मुख्याधिकारी केदार, आदींसह क्युपिड कंपनीचे दुर्गेश गर्ग, प्रदीप कोठुळे, चारुदत्त भिंगारकर, शुभम करमासे, पवन बागुल आदींसह शिवसेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.