सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर – शेतकऱ्यांच्या जमिनींना अधिकाधिक भाव मिळवून देणार – खा. हेमंत गोडसे 

by India Darpan
जून 13, 2021 | 1:58 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210613 WA0216 e1623592707499

सिन्नर :  देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या निर्मितीत नाशिक तालुक्यासह सिन्नर तालुक्यातील १७ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. बाधित शेतकऱ्यांना शासन कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. शासन आणि मी स्वत: शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करणार आहे. गेल्या तीन वर्षात अधिक भावाने झालेल्या खरेदी खताची प्रत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे दिल्यास त्या भावाने मुल्यांकन करुन सुमारे पाच पट अधिक भाव बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिगोटे, मोनोरी, दोडी खुर्द, बुद्रूक, शिवाजीनगर, दातली, गोंदे, मुसळगाव, कुंदेवाडी, कसबे सिन्नर, बारगाव पिंप्री, पाटप्रिंप्री, देशवंडी, वडझरे, मोह, चिंचोली, वडगाव पिंगळे या १७ गावांमधून हा रेल्वे मार्ग जात आहे. या गावातील बाधित शेतकऱ्यांची आज पंचवटी मोटेल्स सभागृहात विशेष बैठक पार पडली. नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार राहुल कातोडे, प्रांताधिकारी पुजा गायकवाड, युवानेते उदय सांगळे, संजय सांगळे, दीपक बरके, संग्राम कातकाडे, विजय कातकाडे, संजय सानप आदींसह शेतकरी उपस्थित होते.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुंटुबातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी, प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुस सर्व्हिस रोड असतावेत, बाधित क्षेत्राचा सातबाऱ्यावर सध्यास्थितीतील असलेल्या झाडांच्या नोंदी असतो वा नसोत तरी झाडांची भरपाई ग्राह्य धरावी, बाधित शेतकऱ्यांच्या कुंटुबियांना नाशिक – पुणे रेल्वे गाडीत मोफत प्रवास सुविधा मिळावी, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, गरजेपेक्षा जास्त् क्षेत्र संपादित करुन नये, औद्योगिक क्षेत्रातील कंपनी बाधित होणार नाही, याची अधिकाधिक काळजी घ्यावी, छोटे पुल आणि क्रॉसिंग स्टेशन कुठे आहेत, पाईपलाईन कुठे-कुठे आणि कशाप्रकारे टाकणार आहेत याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना मिळावी आदी मौलीक सूचना यावेळी १७ बाधित गावांमधील शेतकऱ्यांनी मांडल्या.

तहसीलदार कातोडे आणि नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या शंका-कुशंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. अजुन काही शंका-कुशंका तसेच काही हरकती असल्यास सक्षम अधिकाऱ्याकडे लेखी नोंदवाव्यात असे आवाहन यावेळी खा. गोडसे यांनी केले आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा देशातील पहिला सेमीहायस्पीड रेल्वे  प्रकल्प असून या प्रकल्पामुळे नाशिक-अहमदनगर या जिल्ह्यांचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा पुरेपूर मोबदला मिळणार आहे. रेडीरेकनरचा दर खूपच कमी असल्याने गेल्या तीन वर्षात अधिक भावाने झालेल्या खरेदी खताची प्रत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे दिल्यास त्या भावाने मुल्यांकन करुन सुमारे पाच पट अधिक भाव बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या ‘ज्ञानज्योती घरोघरी’ उपक्रम, खा. राऊत यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप

Next Post

सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने सोमवारी मका खरेदीचा शुभारंभ

India Darpan

Next Post
maka e1623593074803

सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने सोमवारी मका खरेदीचा शुभारंभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011