सिन्नर – सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या संचालकपदी सुनील उगले यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. वाचनालयाचे संचालक संजय बर्वे यांचे नुकतेच निधन झाल्याने संचालक पदाची एक जागा रिक्त झाली होती. संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. त्यात उगले यांच्या नावाची सूचना अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी मांडली. त्यास सर्वांनी संमती दिल्याने उगले यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीस कार्यवाह हेमंत वाजे, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य, संचालक राजेंद्र देशपांडे, चंद्रशेखर कोरडे, जितेंद्र जगताप, विलास पाटील, निर्मल खिवंसरा उपस्थित होते. भगत यांच्या हस्ते उगले यांचा सत्कार करण्यात आला.