खासदार गोडसे यांच्या प्रयत्नातून क्यु.पीड. कंपनीच्या
सी.एस.आर. फंडातून तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात मशीन बसणार
सिन्नर : महिलांना मासिक पाळीत भेडसाविणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या सदृढ आरोग्यासाठी ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकीन मशीन, डिस्पोजेबल मशिन कार्यान्वित करण्यात येणार आहेत. खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून सिन्नर येथील क्यु. पीड. कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून तालुक्यातील जवळपास ७० गावांमध्ये हे सॅनिटरी मशीनसह डिस्पोजेबल मशीन बसविण्यात येणार आहेत. या मशीनचा आज सोमवार (दि. ३) रोजी येथील पंचायत समिती कार्यालयात लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.