सिन्नर – संपूर्ण महाराष्ट्रात ६ जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश राज्यसरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना काढल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा साजरा करण्यात आला. मात्र याच पार्श्वभूमीवर वडांगळी ग्रामपंचायने भगवा ध्वज आचार संहिता पाळून शिव राज्यदंड गुडी उभारून २१०० झाडे लोक सहभागातून लावण्याचा संकल्प करत सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व त्यांच्या पत्नी सौ सुनीता मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ केला.
सकाळी सुदेश खुळे यांच्या हस्ते शिव छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार तर आनंदा आढांगळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उर्वरित सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सरपंच योगेश घोटेकर यांनी शिवराजदंड गुडी उभारून शिव छत्रपतींच्या नावाचा गजर केला. उपसरपंच गायत्री खुळे यांनी विधीवत गुडीचे पुजन यावेळी केले.
त्यानंतर शिवशंभो चौकात मुरकुटे दाम्पत्याच्या हाताने वृक्षारोपणाचा शुभारंभ करून जेष्ठांच्या हाताने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच योगेश घोटेकर, उपसरपंच गायत्री खुळे, सुदेश खुळे,गोपाळराव खुळे, शिवाजी खुळे, भागवत खुळे, रामनाथ खुळे,दिनकर खुळे, आनंदा आढांगळे,भीमराव आढांगळे, विकास संस्थेचे चेयरमन शरद खुळे,नानासाहेब खुळे, राहुल खुळे, अमोल आढांगळे, रवी माळी, मिनल खुळे, हर्षदा खुळे, अनिता क्षत्रिय, लता गडाख, योगिता भावसार, विलास खुळे, विक्रम खुळे, अमित भावसार, शंकर गडाख, कैलास खुळे,ग्रामसेवक पांडुरंग सोळंखे सर्व आशासेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
लोक सहभागातून मिलालेली झाडे..
खाया ३५०, सप्तपर्णी ३००, स्पेतुडिया १००, कदंबा २५०, रेन ट्री १००, काशिद २००, अशोका २००, सिल्व्हर ओक २००, पाम १००, आकिश २००, बावा १००.
२१०० झाडे देणारांची नावे….
सरपंच योगेश घोटेकर, प्रकाश खुळे, दीपक खुळे, तुळशीराम खुळे, संपत खुळे, विक्रम खुळे, राहुल खुळे, विलास खुळे, अमोल आढांगळे, दिलीप खुळे, सुनील खुळे, रफिक शेख, राजू आढांगळे, बाळासाहेब खुळे, शैलेश खुळे, नंदकिशोर खुळे, नितीन खुळे, गणेश खुळे, धनंजय खुळे, यासीर शेख, शुभम खुळे.
….
लोकसहभाग गावच्या विकासाची ताकद…
वाढदिवसानिमित्त अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मध्ये वृक्षारोपणासाठी रोख पैसे दिले असून त्या व्यतिरिक्त २१०० झाडांच्या स्वरूपात ग्रामस्थांनी मदत केली आहे. या झाडांची किंमत सुमारे ५ लक्ष रुपये आहे.
योगेश घोटेकर, सरपंच.