नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास ज्वलनशील पदार्थ पतीने टाकला त्यामुळे घराला आग लागली.
या आगीत सासू अनिता शिंदे बायको स्नेहल शिंदे गंभीररित्या भाजल्या गेल्याने जखमी झाल्या आहेत. पत्नी व सासूला जाळण्याच्या प्रयत्नांत पती केदार हंडोरे स्वत:ही जखमी झाले आहे.
या घटनेनंतर पत्नी व सासूला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून पतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कौटुंबिक वाद असून पतीने दोघी झापेत असतांना हे कृत्य केले. पत्नीने स्वत:वरही लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.