सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून सलग तीन वर्षांपासून तामसवाडी येथील रहिवासी व सध्या सिन्नर येथे स्थायिक असलेले दिपक दिनकर आरोटे यांनी सिन्नर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा रामनगर येथे व यावर्षी समर्थ सावली बाल संगोपन केंद्र ठाणगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गोड जेवण तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
या कार्यक्रमासाठी वृक्ष फाउंडेशन चे संचालक, पत्रकार विकास गिते, अनिल चव्हाणके, भाऊसाहेब गडाख, विनोद गोडसे, विठ्ठल पगार, योगेश भुसारे, अभिजीत गडाख, जयदीप चव्हाणके, श्रेया आरोटे, प्रज्ञा आरोटे, अनिता गडाख, भारती चव्हाणके सुवर्णरखा गिते, तसेच रामनगर शाळेतील मुख्याध्यापक खैरनार सर, जे जी सय्यद, जीआर वरखडे, पीबी पाटील, एस के गुळवे, डी टि गुळवे, बी एच निकम व समर्थ सावली येथील संचालक जयराम शिंदे उपस्थित होते.
समर्थ सावली संगोपन केंद्रात विविध किराणा साहित्य, शालेय साहित्य भेट..
ठाणगाव येथील समर्थ सावली बालसंगोपन केंद्र दिपक आरोटे यांनी वाढदिवसानिमित्त अनेक शालेय साहित्य तसेच किराणा साहित्य दिले यावेळी बालसंगोपन केंद्राचे संचालक जयराम शिंदे हे भावुक झाले होते. अतिशय गुणी मुले या बाल संगोपन केंद्रात राहत असल्याने येथे वेगळच वाटत असल्याचे वाढदिवसानिमित्त आलेल्या पाहुण्यांनी बोलून दाखवले. तसेच सिन्नर शहरातील सलून व्यवसायिक दत्ताजी लोखंडे यांनी आपल्या रोजच्या खर्चातून थोडेफार पैसे बाजूला काढीत . जमा झालेल्या पैशातून समर्थ सावली येथील अनाथ गोरगरीब मुलांना बिस्कीटचे पुढे वाटप केले. आमच्या मुलांमध्ये रममाण झाल्याने जयराम शिंदे यांनी आरोटे यांचे आभार मानले.