सिन्नर – तालुक्यातील सोनेवाडी येथील भोजापूर धरणातील गाळ उपसा करण्याचा शुभारंभ सरपंच जिजा पथवे, भोजापूर खोरे गाळ उपसा समितीचे अध्यक्ष गणेश रावले यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोना संदर्भातील शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात आले. धरणातील पाणी साठा वाढण्यासाठी युवा मित्रच्या संकल्पनेतून टाटा ट्रस्ट व घरडा केमिकल्स यांनी आपल्या सी.एस.आर.निधीतून यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे.
युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनिषा पोटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना तसेच धरणाच्या जवळ असलेल्या धुळवाड, चास,कासारवाडी, नळवाडी, दापुर, चापडगाव इ. गावांतील शक्य होईल त्या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील गाळ आपल्या शेतात टाकून जमीन सुपीक करून घेण्याचे आवाहन केले. संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक अजित भोर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्याची संपूर्ण प्रकिया समजावून सांगितली.
यावेळी सरपंच सचिव नवनाथ कांडेकर, युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रितम लोणारे,ऋषिकेश डांगे यांच्या सोबत योगेश परदेशी, माजी सरपंच कैलास सहाणे,रविंद्र सहाणे,विक्रम देशमुख,राजाराम बुरकुल, देवकीनंदन परदेशी, मदन परदेशी, कैलास रावले,सुभाष सहाणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
…
पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा मिटणार
गाळ उपसा केल्यामुळे जलाशयात पाणीसाठा वाढणार असून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली जाणार आहे. तसेच धरणाच्या लाभक्षेत्रातील २१ गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा मिटणार आहे.
डॉ. चंद्रकांत हजारी