सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील टेंभुरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या शेताजवळ मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह विहिरीत पडल्याची घटना पहाटे घडली. यावेळी मांजरीने थेट बिबट्याचा आधार घेत आपला जीव वाचवला. सकाळी विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर सांगळे यांना बिबट्या व मांजर पाण्यात पडलेले दिसून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या कर्मचा-यांनीही तातडीने बिबट्या व मांजरीला बाहेर काढण्याचे काम सुरु केले. ही घटना गावात कळताच बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी बिबट्याने आपला जीव वाचवण्यासाठी विद्युत मोटारीसााठी लावलेल्या लोखंडी अँगलचा तर दुसरीकडे मांजरीने बिबट्याचा आधार घेतल्याचे सर्वांना दिसून आले.