सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूर शिंगोटे दरोडा प्रकरणी ७ आरोपी गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून पोलिसांनी ५ लाख ६९ हजार ९७० रुपये किमतीचे १२७ ग्राम सोन्याचे दागिने, आठ मोबाईल फोन, पाच मोटरसायकली असा एकूण ९ लाख २ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोप यांनी वरील गुन्हे केल्यानंतर सिन्नर व बारामती पोलीस ठाणे अधिक मोटर सायकल चोरीचे काही गुन्हे केल्याची उघडकीस आले आहे.
वावी पोलीस ठाणे हद्दीत २४ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास नांदूर शिंगोटे गावातील रहिवासी संतोष गंगाधर कांगणे व रमेश तुकाराम शेळके यांचे घरामध्ये अज्ञात सहा आरोपींनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून लोखंडी पहार व चाकूचा धाक दाखवून काठीने मारहाण करून लाकडी बेड मध्ये ठेवलेले सुमारे १३९ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम २ लाख ७५ हजार असा एकूण ६ लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडे टाकून चोरून नेले होते. या चोरी प्रकरणी वावी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घरफोडीनंतरर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांनी तात्काळ दरोडा पडलेल्या घटनास्थळी स्थळास भेट देऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील घटनास्थळावर मिळून आलेले सीसीटीव्ही फुटेच्या पडताळणी केली. त्यानंतर आरोपीच्या अंगावरील कपडे व वर्णनाप्रमाणे तसेच गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून गोपनीय माहिती घेऊन तपास पथके रवाना केली होती. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी राजदरवाडी तालुका चांदवड येथून संशयित रवींद्र रवी शाहू गोधडे (१९) रा. राजदरेवाडी तालुका चांदवड, सोमनाथ बाळू पिंगळे (२०) रा. मनमाड फाटा लासलगाव , करण नंदू पवार १९ रा. इंदिरानगर, लासलगाव, दीपक तुळशीराम जाधव रा. चंडिकापूर. वणी यांना ताब्यात घेतले. सदर संशयतांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्या असता त्यांनी दिवाळीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास त्यांचे साथीदारांसह नांदूर शिंगोटे येथील वरील दरोडा दरोड्याचा गुन्हा कबूल दिली सदर आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचे तपासात सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार सुदाम बाळू पिंगळे रा. राजदेरेवाडी, बाळा बाळू पिंगळे, रा. गुरेवाडी तालुका सिन्नर, करण उर्फ दादा पिंगळे रा. गुरेवाडी यांच्यासह मिळून खालील प्रमाणे गुन्हा केल्याचे कबूल केले आहे..
यातील आरोपी क्रमांक पाच ते सात यांना तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सोलापूर तालुक्यातील बाभूळगाव परिसर दोन दिवस विषयांतर करून आरोपीतांचे राहण्याचे ठाव टिकण्याबाबत गोपनीय माहिती काढून मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचुन ताब्यात घेतले आहे.