सिन्नर –रुग्णसेवेसाठी सिन्नर सार्वजनिक वाचनालयास विविध साहित्याची देणगी देणाऱ्या अरुण व सुनील किसनलाल कलंत्री यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या २ व्हील चेअर्स वाचनालयाकडे सुपूर्द केल्या.
वडील किसनलाल कलंत्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अरुण व सुनील कलंत्री यांनी १० वर्षापूर्वी सुमारे दीड लाख रुपयांचे रुग्णसेवा साहित्य दिले. यानंतर वेळोवेळी त्यात त्यांनी साहित्याची भर घातली. आजवर वाचनालयास सुमारे २ लाख ५०हजार रुपये किमतीचे रुग्ण साहित्य त्यांनी दिले आहे. वॉटर बेड, ऑक्सिजन सेट, वॉकर, कुबडी, टॉयलेट चेअर, स्टीलबेड, व्हील चेअर, आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. गरजू रुग्णांना हे साहित्य विनामोबदला अल्प अनामतीवर वापरण्यासाठी दिले जाते. उत्तम दर्जाच्या व्हीलचेअर मिळाल्याने वाचनालयाला रुग्णसेवेसाठी उपयुक्त ठरतील असे सांगून वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी अरुण व सुनील कलंत्री यांचे आभार व्यक्त केले. यावेळी कार्यवाह हेमंत वाजे व संचालक चंद्रशेखर कोरडे उपस्थित होते.