सिन्नर – कुटुंबातील प्रत्येक सदस्य तथा वाढदिवस तसेच वर्षश्राद्ध लग्न समारंभात स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर तालुक्यातील दोडी येथील ह. मु .सिन्नर येथे असलेले वाघ कुटुंबातील वृक्ष मित्र विष्णू वाघ सलग पाच वर्षापासून वृक्षरोपण करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून वृक्ष दान वृक्षरोपण हे संगोपन त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहेत. विष्णू वाघ माळेगाव येथील एका कंपनीत कामाला असून आपल्या गावी शेती असल्याने शेतीची आवड असून ते सातत्याने अनेक शाळा लग्न समारंभ, वाढदिवस, वर्षश्राद्ध अशा अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये वृक्ष भेट देऊन वृक्ष संगोपनाचे कार्य सांगत असतात मागील वर्षी विष्णू वाघ यांना कोविड झाल्याने त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज पडली. त्यावेळी ऑक्सीजन लावला असता. अनेक लोकांना ऑक्सिजनची गरज काय असते हे पटवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला व वृक्ष लागवड ही मोहीम जोऱ्यात स्वतःहून चालू केली. वृक्ष लागवडीचे महत्त्व प्रत्येकाला पटवून दिले. आपल्या कुटुंबा सारखेच ते वृक्षांवर प्रेम करीत असून. मागील पाच वर्षांपासून त्यांनी २०० वृक्ष भेट देऊन व त्यापैकी शेकडो वृक्ष जगवले आहेत. त्यामध्ये कडुनिंब, चिंच, वड या सारखे रोपांची देखभाल करीत .अनेक वृक्ष विनामूल्य प्रत्येक कार्यक्रमात भेट म्हणून ते देत असतात. ही रोपे त्यांच्या गावातील न्यू ब्रह्मानंद हायस्कूल दोडी , प्राथमिक शाळा दोडी, खंबाळे हायस्कूल अशा अनेक ठिकाणी त्यांनी वृक्षलागवड केली आहेत .तसेच त्यांच्या शेतात आजीच्या निधनानंतर आजीची आठवण म्हणून वड वृक्षाची लागवड केली व त्याला आधारवड असे नाव दिले. सध वडाचे झाड लावून व अस्थी विसर्जन न करता त्याची हस्ती, राख झाडांना टाकली. एक सामाजिक संदेश त्यांनी समाजाला दिलेले आहेत. ते स्वतः प्रत्येक कार्यक्रमात जाऊन वृक्ष लागवड व संगोपन या विषयी सांगत असतात . त्यांचे वृक्षलागवडीचे काम बघून विष्णू वाघ यांचे पहिलीचे शिक्षक देसले गुरुजी यांनी त्यांना वृक्षमित्र ही पदवी बहाल केली. यासाठी विष्णू वाघ यांनी त्यांची पत्नी वैशाली दोन मुली सानिका व कांचन यांची मदत त्यांना सदैव मिळत असते
अशी केली सुरुवात
कोरोना मध्ये मला आयुष्यात पहिल्यांदाच प्राणवायू ऑक्सिजन नाकाला लावला व त्याच वेळेस ऑक्सिजन सिलेंडर भेटत पण नव्हते मग मनाशी ठरविले की आतापर्यंत आपण स्वतः झाड लावत होतो. आता सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमात वृक्षभेट द्यायची मग सुरुवात केली.
विष्णू वाघ
– पाच वर्षांपासून अनेक झाडे भेट दिली व वृक्षारोपण केले.
– लग्न समारंभ वाढदिवस वर्ष श्राद्ध ग्रहशांती अशा अनेक कार्यक्रमात वृक्ष वल्ली भेट दिली.
– मागील दोन ते तीन वर्षांपासून सुमारे दोनशे ते अडीचशे रिक्षांची लागवड व ९० टक्के वृक्ष जगवली.
– स्वतःच्या खर्चातून दोनशे झाडांची लागवड व संगोपन.
– मागील वर्षात कोरोना झाल्यानंतर ऑक्सिजन ची गरज काय असते हे समजल्यानंतर अशी वेळ कोणाला येऊ नये यासाठी व समाजासाठी वृक्ष लागवडीचा संकल्प केला.