सिन्नर – वाढत्या शहरीकरणामुळे सिन्नर शहरातील नागरिकांना व्यायामाच्या पुरेशा सुविधा कमी पडू लागल्याने त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत २ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे.त्याद्वारे ग्रीन जीम व व्यायामशाळांची कामे होणार आहेत.
सिन्नर शहर व उपनगरांतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधाही तोकड्या वाटू लागल्या आहेत.धावपळीमुळे घराजवळच व्यायामाची सुविधा असावी असे नागरिकांना वाटते.त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच्या ठिकाणी व्यायामची सुविधा मिळण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे नगरपालिकेतील तत्कालीन विरोधी गटाने व्यायामशाळा व ग्रीनजीम कामाना राज्यशासनाकडून मंजूरी मिळवून आणण्याची विनंती केली होती.त्यानुसार आमदार कोकाटे यांनी नगरविकास विभागाकडून उपनगरांमध्ये व्यायामशाळा बांधकाम व ग्रीनजीमच्या कामांबरोबरच व्यायामशाळा साहित्यास मंजूरी मिळवून आणली.ही कामे लवकरच होवून नागरिकांना आता त्यांच्या उपनगरातच व्यायामची सुविधा मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
व्यायामशाळा व अ नुषंगिक कामे काजीपूरा भाग (२० लक्ष),गोरजेमळा समर्थ (२० लक्ष),नागेश मित्र मंडळ अपना गॅरेज (१५ लक्ष),खर्जेमळा (१५ लक्ष) व वैदुवाडी म्हसोबा मंदिर (१५ लक्ष) या ठिकाणी व्यायामशाळांची कामे होणार आहेत तर गावठा येथील विठ्ठलेश्वर व्यायामशाळा (१० लक्ष),संजीवनी नगर व्यायामशाळा (१० लाख),गोजरेमळा येथील व्यायामशाळा (१० लाख),शिवराय कला क्रीडा मंडळ (१० लाख) या ठिकाणी साहित्य खरेदी व अनुषंगिक कामे होणार आहेत.भैरवनाथ सोसायटी(२० लक्ष), मुक्तेश्वर नगर (१५ लाख) या ठिकाणी ग्रीनजीम उभारण्यात येणार आहे.तर शिवाजी नगर येथे टर्फ क्रिकेट मैदान उभारण्यासाठी २० लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.
सुशोभीकरणासाठीही निधी..
शिवाजीनगर येथील गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी १५ लाख तर नागेश्वरी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत.शिवाई हॉस्पिटल मागील शिवनदीवर घाट बांधण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत होती. त्यासाठीही ३० लाख रुपये मंजूर झाले आहेत.