सिन्नर – सिन्नर नगर परिषदेची प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अभ्यासिका लोकार्पण कार्यक्रम भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रांक निर्माण निगम लिमिटेड, दिल्लीच्या अध्यक्षा तृप्ती पी. घोष, निदेशक(मानव संसाधन) एस. के. सिन्हा, मुख्य महाप्रबंधक सुधीर साहू, सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रांक निर्माण निगम निगम लिमिटेड, नाशिक यांचे सीएसआर परियोजना अंतर्गत सदर अभ्यासिका निर्माण करीत निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. उपलब्ध करून दिलेल्या निधी अंतर्गत तयार करण्यात आलेले अभ्यासिका पाहण्यासाठी खास दिल्ली येथून अधिकारी येऊन इमारतीचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. ISP च्या अध्यक्षा तृप्ती घोष यांनी सदर अभ्यासिकेतून अभ्यास करणारे विद्यार्थी विवध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन यशस्वी व्हावेत व देशपातळीवर सिन्नर शहराचे नाव लौकिक करावे यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे प्रयत्नातून सिन्नर शहरात अद्यावत अभ्यासिका उभारण्यासाठी भारत प्रतिभूती मुद्रणालय, नाशिक यांचे सीएसआर परियोजना अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सिन्नर नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष किरण डगळे व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी यासाठी पाठपुरावा केला. १० डिसेंबर २०२१ रोजी सदर अभ्यासिकेस प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे नाव देण्यात येवून राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांचे शुभ हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले होते.
यावेळी भारत प्रतिभूती मुद्रणालय, नाशिकचे विनोद महरिया, संयुक्त महाप्रबंधक (मानव संसाधन) सचिन सोनी, उप प्रबंधक (मानव संसाधन) सुमित पाटील, दिलीप पांचाळ, विक्रांत पांडे, सिन्नर नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता सौरभ गायकवाड, सिद्धेश मुळे, शहर व्यवस्थापक अनिल जाधव, आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, निवृत्ती चव्हाण, हसन शेख, अर्फत शेख, संतोष जाधव, निशा कापुरे, वर्षा क्षीरसागर यांचेसह अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.