विकास गिते, सिन्नर
सिन्नर – येथील सिन्नर – शिर्डी महामार्गावर खळवाडी परिसरातील ज्वारीचे पीक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जोमात आले असून सद्यस्थितीत ज्वारी पोटात भरलेली असून .तिचे दाणे बाहेर पडू लागलेली आहे. तसेच एप्रिल महिन्यात सर्वत्र उन्हाने काहोली केल्याने याचा परिणाम पशुपक्ष्यांसह जनसामान्यांवर दिसू लागलेला आहे. अन्न पाण्यासाठी मनुष्य हा दरमजल जाऊ शकतो पण पशुपक्षी अन्न पाण्यासाठी सर्व दूर जाऊ शकत नाही. यासाठी ज्ञानदेव विठ्ठल नवले यांनी शेतात येणारी पाखरे आपल्या कुटुंबाचा एक भाग असून त्यांच्या अन्न पाण्यासाठी एक अनोखी भूत दया दाखवून सुमारे १८ गुंठे ज्वारीचे उभे पीक पाखरांसाठी सोडले आहे. त्यामुळे हजारो पाखरांची दाण्या पाण्याची सोय झाली आहे. नवले यांनी पशुपक्ष्यांवर भूतदया दाखवत आपल्या सुमारे १८ गुंठे शेतातील दोन टप्पे करून उभे पीक पशु पक्षांसाठी खुले करून एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सुमारे काही दिवसांपूर्वी ज्वारीचे पीक पाण्यावाचून वाळून चाललेले असताना शेजारीच असलेले किसन पवार या शेतकऱ्याने ज्ञानदेव नवले यांनी पाण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी लागलीच पवार यांनी होकार दिला. सुमारे तीन ते चार पाणी दिल्यानंतर वाळून चाललेले पीक हे डोलाने उभे राहिले. तसेच शेजारी पाण्याची मोटर सुरू असल्याने शेतात रोज अन्न पाण्यासाठी हजारो चिमण्या ,साळुंख्या असे अनेक पाखरे यायला लागले असून त्यांच्या अन्नाची सोय उपलब्ध झाल्याने ती जोमाने इकडे तिकडे बागडत असून मुक्तविहार करत आहे.
नवले यांची अशी युक्ती
सर्वत्र उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठलेला आहे. अशातच मनुष्य हा पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे. पण पशुपक्षी यांना पाणी व अन्न नाही मिळाले तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी ज्ञानदेव नवले यांनी दुसऱ्याच्या शेतातील सुमारे सात हजार रुपयाचे पीक विकत घेऊन ज्वारीचे कणीस पशुपक्ष्यांसाठी खुले करण्याचा मानस केला व खाली राहिलेले ताठे हे चारा म्हणून जनावरांना वापरणार आहेत. यासाठी त्यांना त्यांच्या परिवारातील पत्नी मुलगा सून व पत्नी यांची मोठी मदत झाली. पशुपक्षी हेच आपल्या कुटुंबातील एक घटक असल्याचे ज्ञानदेव नवले सतत सांगत असतात पशुपक्षी अन्न-पाण्यावाचून दरमजल भटकंती होऊ नये यासाठी त्यांनी सुमारे १८ गुंठे ज्वारीचे पीक पशुपक्ष्यांसाठी खुले केले लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील शिक्षक म्हणून ज्ञानदेव विठ्ठल नवले हे कार्यरत आहेत.
असा ठेवला आदर्श
मागील दोन वर्षापूर्वी ही त्यांनी उभे ज्वारीचे पीक पशुपक्ष्यांसाठी खुले केले होते. एक नवा आदर्श या शिक्षक व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वांसमोर ठेवलेला आहे. आपण सर्वांसमोर, मुलांसमोर व परिवारा समोर हा आदर्श ठेवला तर सर्वांना याची जाणीव होऊन पशुपक्ष्यांना भटकंती करावी लागणार नाही असे ज्ञानदेव नवले सतत सांगत असतात.शुपक्ष्यांना भटकंती करावी लागणार नाही असे ज्ञानदेव नवले सतत सांगत असतात.