सिन्नर – सिन्नर नगरपरिषद येथे कार्यरत असलेले मुख्याधिकारी संजय केदार यांचे पदोन्नती होऊन अ वर्ग मुख्याधिकारी म्हणून सिन्नर नगरपरिषद येथेच पदस्थापना देण्यात आली. याचे औचित्य साधून सिन्नर नगरपरिषद अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने शॉल, बुके देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सिन्नर नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर सिन्नर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी प्राधान्य दिले व सिन्नर शहर देशात पश्चिम विभागात दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळविले. नागरी सुविधा लोकाभिमुख करून शासनाच्या विविध योजना त्यांनी जनसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यावर भर दिला. तसेच सिन्नर नगरपरिषद घनकचरा प्रकल्प, सिन्नर शहरातील रस्ते, गटार याबाबतची कार्य त्यांनी चांगले केले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत सन २०२०-२१ व २०२१-२२ असा दिव्यांग बांधव यांचेसाठी ५% राखीव निधी १००% खर्च केला असून १०० दिव्यांग बांधव यांच्या थेट बँक खात्यावर प्रत्येकी ४० हजार प्रमाणे ४० लक्ष रुपये वितरीत केले आहेत. सदर कार्याची दखल घेत शासनाने नुकतेच त्यांची ब वर्ग मुख्याधिकारी संवर्गातून अ वर्ग मुख्याधिकारी म्हणून पदोन्नती केली आहे.
यावेळी लेखापाल विष्णू हाडके, शहर अभियान व्यवस्थापक अनिल, आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, बांधकाम अभियंता मयुरी, सायली राठी, सौरभ गायकवाड, सिद्धेश मुळे, राहुल मुंगसे, तुषार लोखंडे, अर्जुन भोळे, अजय कोलते, सुधाकर दराडे, रोशन चव्हाण, सतीश शिंदे, जगदीश वांद्रे, दिलीप गोजरे, दामू भांगरे, राजेंद्र आंबेकर, कैलास शिंगोटे, निवृत्ती चव्हाण, मंगेश आहेर, अमित रायते, ज्योती सोनवणे, अलका पावडे, वृषाली जाधव, अशोक खेलूकर, अरफात शेख, ताहीर शेख, समाधान सापुते, राहुल आहेर, कल्पेश उगले, ज्ञानेश्वर घेगडमल, बाळू भोळे, गोरख वाघ, ज्ञानेश्वर लोंढे, संजय मुरकुटे, हसन शेख , प्रकाश घेगडमल, बबलू शेख, संतोष जाधव यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.