सिन्नर – तब्बल १९७५ पासून २०१९ पर्यंत सर्व माजी विद्यार्थी यांचा एकत्रित स्नेहमेळावा संपन्न. पूर्वीची असलेली जनता विद्यालय सिन्नर व आत्ताची असलेली मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक हेमंत नाना वाजे तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष किरणजी डगळे, माजी प्राचार्य आर डी पवार नगरसेवक सुहास गोजरे , संतोष शिंदे, सुजाता तेलंग माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ उपमुख्याध्यापिका के आर राहणे पर्यवेक्षिका पि डी जाधव पर्यवेक्षक व्ही एन शिंदे,मा नगरसेवक मनोज भगत,आर्किटेक्ट संजय आनेराव किशोर जाधव, डॉक्टर उमेश येवलेकर,डाॅ दिलीप गुरुळे, उद्योजक संदिप ठोक,आर्किटेक्ट उदय गायकवाड ,आर्किटेक्ट दत्ता बोराडे ,स्वाती पवार ,शिल्पा गुजराती ,रावसाहेब आढाव, रतन नाठे, फार्मसीट अनिल कुंदे , उद्योजक किशोर जी देशमुख, मनोज भंडारी, प्रा.गणेश पाटील आदि उपस्थित होते
लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय या विद्यालयाचे पूर्वीचे नाव जनता विद्यालय असे होते. जनता विद्यालय शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याप्रसंगी मविप्र संचालक हेमन नाना वाजे यांनी असे प्रतिपादन केले की, मविप्र संस्था ही कर्मवीरांच्या योगदानातून उभी राहिली असून पुढे संस्थेच्या अनेक देणगीदार यामुळे संस्थेची भरभराट झाली. संस्थेच्या विविध क्षेत्रातील गुणवत्तेची माहिती दिली. यावेळी श्री हेमंत वाजे हे स्वतः १९७५ च्या बॅचचे व एसएससीचे पहिले विद्यार्थी असल्याचे सांगितले. वाजे विद्यालयाला गुणवत्तेचा इतिहास आहे. जनता विद्यालयाच्या अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनीअर, वकील, समाजसेवक, राजकीय क्षेत्रातील विविध पदावर त्यांनी पदे भूषवली आहेत. शाळेची माजी विद्यार्थी हीच खरी मालमत्ता असल्याचे श्री हेमंत वाजे यांनी सांगितले. तसेच माजी विद्यार्थी यांनी आर्थिक योगदानातून शाळेचे अनेक गरजा पूर्ण करता येतील असेही वाजे यांनी सांगितले. शाळेची ऑडोटोरीयल हॉलची गरज संस्था स्तरावर माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वाजे यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. तसेच माजी विद्यार्थी संघाचे आवश्यकता व संघाचे रचना या विषयी माहिती व संचालक हेमंत वाजे यांनी उपस्थितांना सांगितली. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी शालेय जीवनातील पाच वर्षे हे पुढील पन्नास वर्षासाठीअतिशय महत्त्वाची असते सांगितले. तसेच सिन्नर कॉलेजचे माजी प्राचार्य आर. डी. पवार यांनी भावी काळामध्ये शाळांना ग्रेड दिली जाणार आहे. यासाठी माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
च यावेळी अतुल झळके, विजय बोराडे, किशोर देशमुख, प्रीती पवार , ऋतुजा डावखर ,शिल्पा गुजराती, प्राध्यापक गणेश पाटील, डॉक्टर उमेश येवलेकर, मनोज भंडारी ,रतन नाठे, नगरसेवक सुहास गोजरे ,नगरसेविका सुजाता तेलंग, सुनिता वाळुंज, सुनिता चव्हाणके -माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शाळेसाठी आम्ही सर्व उपस्थित आर्थिक योगदान देण्यासाठी सक्षम आहोत. यापुढे शाळेला कोणत्याही गरज असेल ती पूर्ण करू असे आश्वासन सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिले .शाळेसाठी माजी विद्यार्थी संघ ह्या नावाने ऑडिटोरियम बांधण्यासाठी सर्व आर्थिक मदत माजी विद्यार्थी संघाकडून केले जाईल असे माजी विद्यार्थी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज कृष्णाजी भगत यांनी जाहीर केले. माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ यांनी शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान यापूर्वी डिजिटल क्लासरूम , स्टेज वरील डोम,डेस्क,शोकेस यासाठी लाभले असल्याचे सांगून .शाळा हे कुटुंब असल्याचे प्रत्येक घटकाचे आपले काम योग्य केल्यास सर्व गरजा पूर्ण होतील अशा भावना व्यक्त केले.
४५ वर्षांपूर्वींचे माजी विद्यार्थी एकत्र आल्यामुळे आनंदाला उधाण
माजी नगराध्यक्ष किरण डगळे तसेच विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ,राजकारण,समाजकारण,शिक्षण,सहकार,कृषी, प्रशासन मधील माजी विद्यार्थी ४०/४५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मित्र मैत्रिणी एकत्र आल्यामुळे आनंदाला उधाण आले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले होते. या निमित्ताने गतकाळातील रम्य आठवणी ताज्या झाल्याचा प्रत्यय येत होता. प्रत्येकजण आपुलकीने एकमेकांची खुशाली विचारत होता. सर्वजण काही काळ भावनाविवश झाल्याचे चित्र होते. त्यातून बाहेर येत आपण ज्या विद्यालयात शिकलो,ज्ञान घेऊन मोठे झालो. ज्या शिक्षकांनी आपल्याला घडविले,संस्कार केले त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही. परंतु त्याच्यातून अंशतः का होईना उतराई होण्यासाठी काहीतरी केले पाहिजे या विचारमंथनातून एक विचार पुढे आला. विविध सांस्कृतिक समाजिक शैक्षणिक उपक्रमासाठी मोठ्या सभागृहाची उणीव होती, ती भरून काढण्यासाठी सर्वच माजी विद्यार्थी एकवटले हे काम विनाविलंब होण्यासाठी त्वरित निधी उभारण्यासाठी व नियोजित सभागृहाच्या उभारणीसाठी सर्वानुमते एक कार्यकारिणी निवडण्यात आली जनता विद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे स्थापना करण्यात येऊन अध्यक्षपदी मनोज भगत, उपाध्यक्ष सौ सुनिता वाळुंज, किशोर देशमुख, रावसाहेब आढाव ,सौ शिल्पा गुजराती,सचिव प्रीती पवार उपसचिव मनोज भंडारी दत्ता बोराडे खजिनदार अनिल कुंदे सह खजिनदार गणेश मुरकुटे सल्लागार डॉक्टर उमेश येवलेकर, किरण डगळे, डॉक्टर दिलीप गुरुळे ,संजय आव्हाड, स्मिता कोकाटे ,संजय आनेराव, उदय गायकवाड, विजया पगार, स्वाती पवार ,प्रवीण चव्हाण के, सदस्यपदी सुजाता तेलंग, अतुल झळके, सुहास गोजरे, संतोष शिंदे, किशोर जाधव, ऋतुजा डावखर, ज्ञानेश्वर नवले, भास्कर बोराडे ,मृणाल पंडित ,संदिप ठोक , रतन नाठे ,शितल गाडे,गणेश ठोक, स्वाती शिंदे, नितेश दातीर, सुनिता चव्हाण के, वासुदेव भगत, मनोज टाक, विकास गिते ,सीमा बाकळे, ज्ञानेश्वर कोकाटे, नितीन भगत, नानासाहेब चौधरी, संजय शिंदे, सीमा भांगरे ,अमोल चव्हाण के, डॉक्टर प्रशांत गाडे, डॉक्टर सचिन सोनवणे, मिलिंद पवार, सीमा बाकळे, रोहिणी शिंदे, निकिता गायकवाड, कावेरी घोटेकर, सुवर्णा निकम, ईश्वर भडांगे गणेश कर्पै , योगेश शेजवळ , जालिंदर काळे ,रविंद्र आरोटे , अनिल वाजे , अजिंक्य मुदबखे , आदि उपस्थित होते , मविप्र समाजाचे संचालक हेमंत वाजे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या या सभागृह बांधणी सामुदायिक उपक्रमाचे स्वागत करून सर्वांचे आभार मानले.दर वर्षी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करावा अशी सूचना वाजे यांनी केली, कार्यक्रमाचे सुञसंचालन एस टी पांगारकर , कासार सर यांनी केले .